spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘ती बाई आम्हाला काय शिकवणार?’ चंद्रकांत खैरेची टीका

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे.

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. यात दोन्ही पक्ष हे एकमेकांना चिमटा काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, अनेकदा दोन्ही बाजूंनी टीका करताना पातळी सोडली जात असल्याचंही दिसून येत आहे. असाच एक प्रकार सध्या घडताना दिसत असून अमरावतीमधील खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Shiv Sena leader Chandrakant Khaire) यांनी एकमेकांवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे.

एकीकडे नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा केलेला एकेरी उल्लेख तर दुसरीकडे चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) टीका करताना वापरलेली आक्षेपार्ह भाषा, यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

जळगावमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. मात्र, टीका करताना राणा यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्व मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. “ती बाई म्हणजे तुम्हाला माहितीये चित्रपटात कशी सिगरेट पिते. फोटो कसे काढते. कसे कपडे असतात. ती बाई काय बोलणार? सिगरेट पिऊन दाखवते ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती बाई हनुमान चालिसाविषयी आम्हाला शिकवते का?” अशा शब्दांत खैरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.

हे ही वाचा  :

सातारा जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा वाढवणार – शंभूराज देसाई

‘बॉयकॉट बॉलीवूडच्या’ ट्रेंडमध्ये, ४०० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’ चे नक्की होणार तरी काय ?

‘… ४५ हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य ‘, चंद्रशेखर बावनकुळे

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss