spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा; शरद पवारांनी केली मध्यस्थी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार होते, पण त्यांना असं करण्यापासून शरद पवार यांनी रोखलेलं आहे

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यात अनेक पक्षाकडून बैठक पार पडत आहेत. एकनाथ शिंदे गट सध्या गुवाहाटीमध्ये असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 पेक्षा अधिक आमदार आहेत. त्यांचे आमदारांसोबतचे काही व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होत असून ते चर्चेत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार हे त्यांच्या इच्छेने गुवाहाटीला गेले नसल्याचं अनेकदा शिवसेनेकडून बोललं जातंय, आज नेते एकनाथ शिंदे यांनी प्रथमच शिंदे गटावर होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले.

दुसरीकडे एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार होते, पण त्यांना असं करण्यापासून शरद पवार यांनी रोखलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व परिस्थितीचा अंदाज बघता या आधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, तेव्हा ही त्यांना शरद पवारांनी असं करण्यापासून थांबवलं होतं अशी माहिती मिळतेय. या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला होता, तेव्हाच ते राजीनामा देत असल्याची घोषणा करणार होते. लाईव्ह येण्याच्या काही तास आधी त्यांना शरद पवार यांचा फोन आला होता, त्यानंतर त्यांनी आपला विचार बदलला असं बोललं जातंय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यात ते राजीनामा देण्याची घोषणा करणार होते. कॅबिनेट ची हि शेवटची बैठक असणार अशा ही चर्चा रंगल्या होत्या परंतू पुन्हा एकदा शरद पवारांनी मध्यस्थी केली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला तूर्तास दिलासा दिला आहे. ११ जुलैपर्यंत निलंबनाची कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही असे आदेश कोर्टाने दिले आहेत. ११ जुलैपर्यंत मुदत दिल्यामुळे हे राजकीय महानाट्य अजून लांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे पुढे काय घडामोडी घडणार हे पहावं लागेल.

Latest Posts

Don't Miss