spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जागतिक साक्षरता दिन: जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

1947 मध्ये देशाचा साक्षरता दर फक्त 18% होता.

८ सप्टेंबर हा दिवस आंतररष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून ओळखला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या थीम्ससह हा दिवस जगभर साजरा केला जातो. समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक साक्षरता दिवस भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यात भारताचे सर्व शिक्षा अभियान हे या दिशेने टाकलेले स्तुत्य पाऊल आहे. त्यामुळे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत याचं जागतिक साक्षरता दिनाबाबत. नमस्कार टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.

जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो . पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस १९६६ मध्ये साजरा करण्यात आला. साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ लिहिता आणि वाचता येणे. जगातील सर्व देशांमध्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरुवात करण्यात आली.

प्रथम UNESCO ने ७ नोव्हेंबर १९६५ रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जाऊ लागला. युनेस्कोच्या निर्णयानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९६६ मध्ये पहिल्यांदा साक्षरता दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना राष्ट्र आणि मानवी विकासासाठी त्यांच्या हक्कांची माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि या ज्ञानासाठीच शिक्षण दिले जाते. लोकांना शिक्षणाकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने साक्षरता दिन साजरा केला जातो. ज्यामध्ये जगातील सर्व देश हा दिवस विशेषतः प्रौढ शिक्षण आणि साक्षरता वाढवण्यासाठी साजरा करतात.

दरवर्षी साक्षरता दिनानिमित्त एक विशेष थीम असते. जर गेल्या काही वर्षांच्या थीमवर आपण नजर टाकली तर:

  • २०१६ साली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची थीम – भूतकाळाचे वाचन, भविष्य लेखन ही होती.
  • २०१७ थीम- डिजिटल जग
  • २०१८ साक्षरता आणि कौशल्य विकास होती.
  • २०१९ साक्षरता आणि बहुभाषिकता
  • २०२० कोविड-१९संकट आणि साक्षरता
  • २०२१ साली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची थीम डिजिटल डिव्हाईड ब्रिजिंग” ही होती.

जर भारताच्या साक्षरतेचा विचार केला तर, भारताचा साक्षरता दर जागतिक साक्षरता दरापेक्षा ८४% कमी आहे. २०११
च्या जनगणनेनुसार भारताचा एकूण साक्षरता दर ७४.४ % आहे. १९४७ मध्ये देशाचा साक्षरता दर फक्त १८% होता. केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य आहे, जिथे ९३% लोक साक्षर आहेत. यात पुरुष साक्षरता ९६% आणि महिला साक्षरता ९२% आहे. तर, बिहार राज्य हे देशातील कमी साक्षरता दर असलेले राज्य आहे, जिथे ६३.८२% लोक साक्षर आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सर्वात मोठी अपडेट, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार

आता कारमध्ये देखील सर्वाना सीट बेल्ट बंधनकारक – नितीन गडकरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss