spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरे, अस्लम शेख येणार अडचणीत ?

मढ मार्वे (madh marve) येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मढ मार्वे (madh marve) येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून (Mumbai Mahanagar Palika) याप्रकरणी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे.

महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती याप्रकरणाची चौकशी करणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या समितीची स्थापना केली आहे. त्यांचा अहवाल ४ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालाडच्या मढ, मार्वे, इरानगल आणि भाटी येथे ४९ बेकायदेशीर स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला होता. बीएमसीनं चौकशीचे आदेश दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आरोप केला की, चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे सिद्ध होईल की, उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले असलम शेख (Aslam Shaikh) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे या घोटाळ्यात सहभागी होते. मढ मार्वे येथे तयार करण्यात आलेल्या ४९ फिल्म स्टुडिओंच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे.

आरोपांचं गांभीर्य आणि बेकायदा बांधकामाची तक्रार पाहता उपायुक्त हर्षद काळे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. काळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ४ आठवड्यांत अहवाल सादर करतील. त्याचबरोबर दोषींवर कारवाई करण्याची शिफारसही करणार आहेत. आयुक्त चहल यांनी सात मुद्द्यांवर तपास प्रक्रिया पुढे नेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बीएमसीचे अनेक अधिकारीही अडकण्याची भीती आहे.

हे ही वाचा:

जागतिक साक्षरता दिन: जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणी, खा.नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सर्वात मोठी अपडेट, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss