spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सॅम बहादुर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अभिनेता विकी कौशल सध्या मोठ्या प्रमाणत चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरत चाललेला आहे. मेहनत करुन त्याने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे.

अभिनेता विकी कौशल सध्या मोठ्या प्रमाणत चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरत चाललेला आहे. मेहनत करुन त्याने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. विकी कौशलने बऱ्याच ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आता विकी कौशल हा आणखी एका चरित्रपटामध्ये दिसणार आहे.

गेल्या वर्षी त्याचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शूजित सरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. विकीचा हा ऐतिहासिक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सरदार उधम चित्रपटामध्ये केलेल्या कामाबद्दल विकीचे सर्वांनी कौतुक झाले होते. त्याच्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. विकी कौशल बॉलिवूडमधला सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

आता विकी कौशल ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सरदार उधमनंतर विकी आणखी एका चरित्रपटामध्ये दिसणार आहे. भारताचे आठवे लष्करप्रमुख ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ’ यांच्या आयुष्यावर आधारलेल्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामध्ये तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही महिन्यापूर्वी चित्रपटांच्या निर्मात्यांनी केली होती. सॅम माणेकशॉ यांच्यासारखा गेटअप केलेला विकी कौशलचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सध्या विकी या चरित्रपटाच्या चित्रीकरण करण्यात गुंतलेला आहे.

सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटामध्ये विकी कौशलसह सायना मल्होत्रा आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत. सायना सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची, तर फातिमा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहेत. विकीच्या ‘राझी’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनीच केले होते.

विकीने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोच्या कॅप्शनवरुन तो सध्या एखाद्या हिलस्टेशनजवळ त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे असा अंदाज लावला जात आहे. फोटोमध्ये विकीने पाठीच्या बाजूला ”सॅम बहादूर” असे लिहिलेला हिरव्या रंगाचा हुडी घातला आहे. त्याचबरोबर त्याने निळ्या रंगाची जॉगर्स आणि डोक्यात जांभळ्या रंगाची टोपी घातलेली आहे. नॉर्मल लूक कॅरी करताना विकीने स्टायलिश गॉगल देखील लावला आहे. त्याच्या फोटोतील हुडीवरुन तो सॅम बहादूर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तेथे गेला असल्याचे समजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकीचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे.

 

हे ही वाचा:

श्रीवल्ली उर्फ ​​रश्मिका मंडन्नाने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

आज नीट युजी २०२२ चा निकाल होणार जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss