spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांनी जामीनासाठी केला अर्ज

मुंबईमधील पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Land Scam Case) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)  यांचा हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

मुंबईमधील पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Land Scam Case) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)  यांचा हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत हे पत्राचाळ विकासाचं काम पाहत होते. त्यांना HDIL मिळालेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १.०६ कोटी रुपये हे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊत हेच खरे या घोटाळ्याचे आरोपी असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने १९ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती.

परंतु आता मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला असून यावर उद्या म्हणजे गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीने खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.

हे ही वाचा:

जागतिक साक्षरता दिन: जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणी, खा.नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा

महाराष्ट्रात ई-नोंदणीद्वारे घर खरेदी करणे झाले सोपे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss