spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अथिया शेट्टी-केएल राहुलचे लग्न निश्चित! ४ महिन्यांनी अडकणार लग्नबंधनात

अथिया आणि केएल राहुल पुढील वर्षी २०२३ मध्ये जानेवारी महिन्यात एकमेकांशी लग्न करणार आहेत

बॉलीवूडचे अण्णा म्हणजेच सुनील शेट्टींच्या घरी लवकरच सनई वाजवली जाणार आहे. सुनील शेट्टींची मुलगी अथिया आणि टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अथिया आणि केएल राहुल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांच्या नात्याला घरच्यांनीही मान्य केले आहे. सोशल मीडियावरही या जोडप्याच्या फोटोंचा बोलबाला आहे. अलीकडेच अथिया आणि केएल राहुल देखील सुट्टीवर गेले होते, ज्याचे फोटो अथिया शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केले होते.

बातम्यांनुसार, २०२३ मध्ये, दोघे जानेवारी महिन्यात लग्न करू शकतात, ज्याची तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र, अद्याप दोन्ही कुटुंबांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले आणि ते प्रेमात पडले.

घरच्यांनीही दोघांच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. सुनील शेट्टीचा मुलगा अहानचा डेब्यू सिनेमा ‘तडप’च्या स्क्रीनिंगदरम्यान अथिया आणि केएल राहुल कुटुंबासह मीडियासमोर आले. अथिया शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बॉलिवूडमध्ये विशेष नाव कमवू शकलेली नाही. अथियाने सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेल्या हीरो या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात अथियासोबत सूरज पांचोली मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात अपयशी ठरला. त्यानंतर अथिया अर्जुन कपूरसोबत मुबारकान चित्रपटात दिसली. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही. अथिया शेवटची नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात दिसली होती.

नवीन रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल एकमेकांसोबत त्यांचे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. अथिया आणि केएल राहुल पुढील वर्षी २०२३ मध्ये जानेवारी महिन्यात एकमेकांशी लग्न करणार आहेत. २०२२च्या टी२० (T20) विश्वचषकानंतर काही महिन्यांतच हे जोडपे लग्न करणार आहेत.

हे ही वाचा:

संजय राऊत यांनी जामीनासाठी केला अर्ज

महाराष्ट्रात ई-नोंदणीद्वारे घर खरेदी करणे झाले सोपे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss