spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे घ्या जाणून

ड्रायफ्रुट्समध्ये अक्रोड जरूर खावे. अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अँसिड असते, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

ड्रायफ्रुट्समध्ये अक्रोड जरूर खावे. अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अँसिड असते, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. अक्रोड हे लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे. निरोगी राहण्यासाठी सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. रोज सुकामेवा खाल्ल्याने हृदय, मन आणि शरीर तंदुरूस्त राहतो. सुकामेवा (Dry Fruits)खाल्ल्याने वजन कमी तर होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही (Immunity Power) वाढते. तुम्ही रोज दोन ते तीन अक्रोड खाणे गरजेचे आहे. अक्रोड खाल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण आणि सक्रीय होतो. अक्रोडचे अनेक फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.

  • अक्रोडच्या झाडाच्या सालातून तयार केलेली पेस्ट ही हिरड्या आणि दातांच्या इतर समस्यांवरील उपचारांसाठी वापरली जाते.
  • अक्रोडाची पावडर घ्या आणि त्यात दुध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार वाटेल आणि चेहऱ्याचा ग्लो देखील वाढेल.
  • तेलात अक्रोड फ्राय करा त्यात चवीनुसार पिठी साखर घाला. हे दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे कोरडा खोकला नाहीसा होईल.
  • अक्रोडाच्या वाळलेल्या खोडाची साल घ्या, त्याची पावडर करा त्यात चिमूटभर लवंग मिसळून दंत पावडर म्हणून तुम्ही वापरू शकता.
  • भाजलेले अक्रोड नियमितपणे खाल्याने शरीरातील ताकद वाढण्यास मदत होते.
  • आजारपणात किंवा स्नायूंच्या अशक्तपणामध्ये अक्रोड खाणे चांगले असते.
  • अक्रोड हे वातघ्न असल्यानं संधीवात या आजारावर उपयुक्त आहे. संधीवात असणाऱ्यांनी ७-८ अक्रोडचं सेवन करावं.
  • चेहऱ्यावर काळे वांग असणाऱ्यांनी अक्रोड बारीक उगाळून त्याचा लेप चोळून लावावा. यामुळं काळे वांग कमी होण्यास सुरुवात होते.
  • अक्रोड बीज तेल खाद्यतेल म्हणून उपयोगात येते तर रंग साबणातही सौंदर्यवर्धक म्हणून उपयोगी ठरतं.
  • सहसा जेवणानंतर अक्रोड खावं. यामुळं खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
  • अकाली केस पांढरे होणं, केस गळणं, या तक्रारींवर अक्रोड सिद्ध तेल वापरलं तर केस काळेभोर आणि लांब होतात. हे तेल बनवताना अक्रोड बी सोबत त्याच्या वृक्षाच्या सालीचाही वापर करावा.
  • विसराळूपणा जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी ४-५ अक्रोड खावेत. त्यासोबत प्राणायम व ध्यानधारणा नियमितपणे करावी. यामुळं विस्मरण कमी होऊन बुद्धीवर्धन होतं.

अक्रोड खरेदी करताना शक्यतो त्याच्या कवचासह खरेदी करावा. जेव्हा तुम्हाला अक्रोड खायचं असेल तेव्हाच ते फोडावं. कारण फोडलेला अक्रोड जेवढे दिवस बाहेर राहिल तेवढे त्याचे गुणधर्म, स्वाद आणि चव कमी होत जाईल.

हे ही वाचा:

जागतिक साक्षरता दिन: जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणी, खा.नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss