spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे आखणार रणनिती; तब्बल 6 दिवस करणार विदर्भ दौरा

१७ सप्टेंबरला सायंकाळी रेल्वेने ते नागपूरसाठी प्रयाण करतील

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. एकीकडे महाविकास आघाडी या निवडणूका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे मिशन मुंबई म्हणत भाजपने देखील आता निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. तर आता मनसे देखील आपली तयारी सुरु केली आहे आणि या तयारीची सुरुवात मनसे प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौरयाने करणार आहेत.१७ सप्टेंबरला सायंकाळी रेल्वेने ते नागपूरसाठी (Nagpur) प्रयाण करतील आणि १८ ला सकाळी त्यांचे नागपुरात आगमन होईल. त्यानंतर तब्बल सहा दिवस म्हणजे २३ तारखेपर्यंत ते विदर्भात असणार आहेत. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पक्ष संघटन वाढविणे, हादेखील या दौऱ्यामागील उद्देश आहे. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. १३ सप्टेंबरला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आनंद एम्बडवार, बबलू पाटील, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर अशा पाच जणांची चमू नागपूर येथे तिन्ही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करणार आहेत.

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे, याकरिता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे. ज्या भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोनचार टक्के मतांचे विभाजन झाले तरी भाजप-मनसे युतीचा उद्देश साध्य होणार आहे. नवे राजकीय समीकरण तयार झाल्यास नागपूर महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते. याचा फायदा मनसेला चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही (Amravati Mahanagar Palika) होऊ शकतो.

कसा असेल राज ठाकरेंचा दौरा?

  • १८ व १९ सप्टेंबर – नागपुर (Nagpur)
  • २० सप्टेंबर – चंद्रपूर (Chandrapur)
  • २१ व २२ सप्टेंबर – अमरावती (Amravati)
  • २३ सप्टेंबर – अमरावतीहून मुंबईसाठी रवाना होतील

हे ही वाचा:

“नशीब ह्यापकिंग यांना खेकडा वाटलं नाही” म्हणत आदित्य ठाकरेंनी केली तानाजी सावंतांवर टीका

नितेश कुमार व शरद पवार यांच्या भेटीत, भाजप विरोधात आघाडी होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss