spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेत्री वर्षा उसगांवकरांनी कोळी समाजातील बांधवांची मागितली माफी, हा व्हिडिओ केला शेअर

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या त्या स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करत आहेत. त्या बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. मात्र यावेळी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत. वर्षा उसगावकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत कोळी समाजाची हात जोडून माफी मागितली आहे.

हेही वाचा : 

पेट्रोल-डिझेल पुन्हा दिलासा देणार, इंधनाच्या किमतीत मोठी कपात होण्याची शक्यता

नेमकं प्रकरण काय आहे ?

‘यामिली’ हा एक मासे विक्रेती करणारा खासगी अॅप आहे. या अॅपने गेल्या काही दिवसांपूर्वी एक जाहीरात प्रसिद्ध केली होती. यात ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’ अशा आशयाची ही जाहीरात होती. त्यामुळे ही जाहीरात चांगलीच व्हायरल झाली होती. वर्षा उसगांवकर यांनी या जाहीरातीत ‘बाजारात अनेकदा कोकणींकडून माझी फसवणुक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले’, असे विधान केले होते.

‘यामिली’च्या जाहीरातीनंतर कोळी समाज चांगलाच संतापला होता. त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. यानंतर ही जाहीरात फेसबुकवरुन काढून टाकण्यात आली. ‘यामिली’ या अॅपचं प्रमोशनदेखील वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं.

नितेश कुमार व शरद पवार यांच्या भेटीत, भाजप विरोधात आघाडी होणार?

यावर अखिल महाराष्ट्र मच्छिमार समितीने ही निषेध नोंदवत म्हटले होते की, वर्षा उसगावकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिने सृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि यातून गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत असल्याचं अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील म्हटलं आहे. सोबतच त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला होता. आता वर्षा उसगावकर यांनी कोळी समाजाची माफी मागून या वादावर पडदा टाकला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचे दर्शन

Latest Posts

Don't Miss