spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील पीडित युवती अखेर सापडली

काल अमरावतीमध्ये आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर भाजप खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं होते. यावेळी पोलीस आणि नवनीत राणा यांच्यात खडाजंगी देखील झाली. याप्रकरणी काल पोलिस ठाण्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. खासदार नवनीत राणा यांनी ज्या मुलीला शोधण्यासंदर्भात काल पोलिसांना अल्टिमेटम दिलं होतं ती मुलगी अखेर सापडली आहे. कालच तिचा शोध लागला असून ती साताऱ्यात सापडली. त्यानंतर आज तिला अमरावती पोलिस घरी आणणार असल्याची माहित समोर येत आहे. याप्रकरणी काल ज्या पोलिसांसोबत खासदार नवनीत राणा यांनी खडाजंगी केली. त्याच पोलीस अधिकाऱ्यांचं भाजपने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन कौतुककेलं.

हेही वाचा : 

दक्षिण भारतातील ओनम सणाच्या दिवशी, बळीराजा येतो प्रजेला भेटायला

मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राण हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह काल थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. या लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. चौकशी दरम्यान ती युवती साताऱ्यात असलायची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. व पीडित युवतीला सातारा येथे पोलिसांना सापडली.

पंतप्रधान मोदीच्या हस्ते आज ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन

काल पोलीस स्टेशनमध्ये काय घडले ?

अमरावतीमध्ये आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर भाजप खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं होते. नवनीत राणा यांनी पोलीस ठाणेदारावर गंभीर आरोप करत तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला, असा सवाल विचारला. त्यावर पोलीस ठाणेदार ठाकरेंनी राणांचे आरोप फेटाळून लावले. आणि त्यामुळे या पोलीस स्टेशनमधील ठाणेदारांचा संयमही सुटला. त्यांनी नवनीत राणा यांना उद्देशून या सगळ्यांना आधी इथून बाहेर काढा, असे सांगितले. त्यामुळे नवनीत राणा आणखीनच संतापल्या. त्यांनी आणखी आक्रमकपणे पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारायाला सुरुवात केली. मात्र, पोलीस ठाणेदारानेही नवनीत राणा यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. संबंधित पोलीस ठाणेदारही आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि शेवटपर्यंत राणा यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत राहिला. अखेर नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आले.

अभिनेत्री वर्षा उसगांवकरांनी कोळी समाजातील बांधवांची मागितली माफी, हा व्हिडिओ केला शेअर

Latest Posts

Don't Miss