spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देशद्रोही याकूब मेमनच्या वादग्रस्त कबरीवर कारवाई सुरु, सात वर्षांनी राजकारण तापलं

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी आणि एलईडी दिव्यांनी सजवण्यात आल्याचे दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर त्यावरून राजकारणही सुरू झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनच्या थडग्याचं थडग्यात रूपांतर झाल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईकरांची माफी मागावी, असे भाजप नेते राम कदम म्हणाले. याकूब मेमनचा मृतदेह मरीन लाइन्स रेल्वे स्थानकासमोर सुमारे ७ एकर जागेत बांधलेल्या मोठ्या कब्रस्थानमध्ये ५ वर्षांपूर्वी दफन करण्यात आले होते.

हेही वाचा : 

आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील पीडित युवती अखेर सापडली

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले,” याकुब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे का सोपवला? अशी विचारणा भाजपा केली आहे. त्यावर बोलताना भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी याकुब मेमनला फासावर लटकवू नका यासाठी काँग्रेसने सह्यांची मोहीम का राबवली होती. १९९३ स्फोटाप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं असताना फाशी रोखण्याची मागणी का कऱण्यात आली? असा प्रश्न विचारला आहे.

दक्षिण भारतातील ओनम सणाच्या दिवशी, बळीराजा येतो प्रजेला भेटायला

अतुल लोंढे यांच्या सवालावर भातखळकर यांनी म्हटले,’याकुब मेमनला फासावर लटकवल्यानंतर जर कुटुंबाने मृतदेह देण्याची मागणी केली असेल तर ती सोपवण्याची पद्धतच आहे. देशद्रोह्यांचं संरक्षण करायचं ही काँग्रेसची निती आहे. ज्या नितीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी बळी पडले. संसदेवर हल्ला केला त्या व्यक्तीला किती वर्ष फासावर लटकवलं नव्हतं. अफजल गुरुला सहा वर्षांनी फासावर लटकवलं होतं तेव्हा कारणं दिली होती,” अशी टीकाही त्यांनी केली. अशा प्रकारे आता राजकारण तापले आहे.

नेमकं प्रकरण काय ? 

मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली असून आता, मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.

अभिनेत्री वर्षा उसगांवकरांनी कोळी समाजातील बांधवांची मागितली माफी, हा व्हिडिओ केला शेअर

Latest Posts

Don't Miss