spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१६ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीला दिले उत्तर देण्याचे निर्देश

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबईतल्या पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी (Patra Chawal Scam) अटक करण्यात आली आहे.

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबईतल्या पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी (Patra Chawal Scam) अटक करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) संजय राऊतांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच संजय राऊतांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला होता. अशातच संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत.

ईडीने खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मुंबई सत्र न्यायालयानं १९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीनं कोठडी सुनावली आहे. तर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयानं १६ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच, याच दिवशी राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे.

मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता होती. पण आता संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नाही. मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

वादग्रस्त मोपलवारांचा आठव्यांदा कार्यकाळ वाढवून मिळवण्याचा प्रयत्न, दोन पदांसाठी धडपड

अहमदनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण, शिर्डीत अचानक कलम १४४ लागू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss