spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘याकूबच्या कबरी’वरुन भाजप – शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु

मुंबईतील १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीवरून (Yakub Memon) वाद सध्या वाद सुरु आहे.

मुंबईतील १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीवरून (Yakub Memon) वाद सध्या वाद सुरु आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत. यावरून सर्व ठिकाणी वाद सुरु झाले आहेत. या सर्व प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. तर यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारनं याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिला, असा सवाल आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विचारला आहे. याकूब मेमनची अंत्ययात्रा आणि अंत्यविधीसाठी तत्कालीन भाजप सरकारनं परवागनी कशी दिली, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच पेंग्विन सेना म्हणाणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिलं आहे. मुंबईत पेंग्विन आणले याचा आम्हांला अभिमान आहे. ‘पेंग्विन आणण्याआधी जिजामाता उद्यान नुकसानीत होतं. पेंग्विन आणल्यानंतर जिजामाता उद्यान सुरळीत सुरु झालं. दररोज सुमारे ३०,००० लोक उद्यानाला भेट देऊ लागले. आम्ही नुकसान भरून काढलं. त्यामुळे कितीही नावे ठेवली तरी आम्ही अभिमानास्पद कामगिरी केली हेच खरं आहे.’, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

याकूब मेमनच्या कबरीचा आणि पालिकेचा काहीही संबंध नाही. स्वत:च्या चूकीचं खापर दुसऱ्याचा डोक्यावर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ती जागा खाजगी ट्रस्टची आहे. याकूब मेमनचा दफन विधी झाला तेव्हा भाजपचं सरकार होतं. त्यावेळी दहशतवाद्याचा दफन विधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कसाबप्रमाणे याकूब मेमनला दहशवाद्यासारखी वागणूक का नाही दिली. याकूबचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला, असे अनेक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच विरोधकांकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राजकारण करतानाही पातळी ठरवायला हवी. धार्मिक प्रकरणावरून वाद निर्माण करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना म्हटलं होतं की, ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे. भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने सुशोभिकरणं केले त्यांना शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही मग हे कसं केलं. याचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे कॉम्प्रमाईज का केलं याचे उत्तर द्यायला हवे, असं बावनकुळे म्हणाले. तेव्हाच्या गृहमंत्री यांनी काय केलं? राज्याचे मुख्यमंत्री गप्प का बसले? त्यांना खुर्ची टिकवण्यासाठी हे करावे लागले का? असे सवालही बावनकुळे यांनी केला आहे.

देशद्रोही याकूब मेमनच्या वादग्रस्त कबरीवर कारवाई सुरु, सात वर्षांनी राजकारण तापलं

आशिष शेलारांचाही ठाकरेंवर निशाणा

सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहिले होते, असा निशाणा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Mumbai BJP President Ashish Shelar) यांनी केला आहे. सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात गेल्यावर दाऊदचे सर्मथक होते. मात्र आता ते दाऊदचे प्रचारक आहेत. कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव ठाकरे यांनी कशी दिली. सुशोभिकरणासाठी संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय, असा आरोप शेलारांनी केला. तसेच पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावं, असा टोलाही शेलारांनी लगावला. याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होते, असंही ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

गुगल डूडलने संगीतकार भूपेन हजारिका यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त केला सन्मान

१६ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीला दिले उत्तर देण्याचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss