spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अचानक आलेल्या पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस

बंगालच्या उपसागरात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कालपासून राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई गणपती विसर्जनाच्या आधल्या दिवशी गणेशभक्त दर्शनासाठी घराबाहेर पडतात परंतु आज संध्याकाळी ५ वाजल्या पासून मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवलीमध्ये जोडदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तासाभरापासून अंधेरीतील तेली गल्ली परिसरात वाहतून कोंडी झाली आहे. वाहणांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेक प्रवासी अडकले आहेत. याचबरोबर ठाणे, कळव्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्यरेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. नागरिकांना या पावसाचा त्रास सहन करावा लागला. पनवेल परिसरातही सखल भागात पाणी साचले होते. उरण तालुका आणि शहरातही जोरदार पावसाच्या सरी बरसल्या; मात्र दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला.

हेही वाचा : 

उद्या गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त

गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली. दिवसभराच्या कडक उन्हामुळे वातावरण अक्षरशः तापून गेले होते. ऑक्टोबर हीटसारखा उकाडा जाणवत होता. परंतु, दुपारनंतर वातावरणात बदल होऊन संध्याकाळी गार वारे वाहण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी ४.३० वाजल्यानंतर आकाशात काळे ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटात सुरू झाला. त्यात पावसानेही जोर धरला. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यालयातून सुटलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे.

सेंट्रल व्हिस्टा उद्घाटन: एव्हेन्यूला मिळणार ६०८ कोटींचा नवा अवतार, जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल

Latest Posts

Don't Miss