spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी काही पौष्टीक पदार्थ

मधुमेहाची समस्या आजकाल खूप वाढताना दिसत आहे.

मधुमेहाची समस्या आजकाल खूप वाढताना दिसत आहे. मधुमेह झाल्यास काही पथ्य पाळावी लागतात. आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेहाची समस्या असल्यास गोड पदार्थावर जास्त नियंत्रण ठेवावे लागते. गोड पदार्थ खाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.मधुमेह असल्यास मनुका,ब्रेड,दूध,बटाटा,भात,साखर,गूळ,यासारखे पदार्थ खाणे टाळावे. मधुमेहाच्या रुग्णांनी वेळेवर झोपणे,उटणे,नियमित पणे व्यायम करणे. औषध वेळेवर घेणे. तसेच योग्य आहारामुळे मधुमेह रुग्णांना असणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. रोजच्या आहारामध्ये भाज्यांचा समावेश जास्त प्रमाणात करावा शक्य तितके घरगुती पदार्थाचे सेवन करावे.

हे ही वाचा : जाणून घ्या… दक्षिण भारतातील ओनम सणांबद्दल

 

काळे चणे खाण्यासाठी खूप चविस्ट असतात. काळ्या चण्यापासून तुम्ही काळ्या चण्यापासून चाट किंवा चण्याची भाजी सकाळी सकाळी उठल्यावर उखडलेले चणे अनुशापोटी खाणे हे सर्व पदार्थ मधुमेहचा रुग्णांसाठी पौष्टिक असते. आणि या पदार्थापासून त्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्याच सोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.तुम्ही तुरट,आंबट,कडू यासारखे पदार्थाचे सेवन करू शकता. मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करतात. डाळींचा वापर सालासकट केल्यास उत्तम असते. आणि संत्री मोसंबी जांभूळ आवळा यासारखे फळ तुम्ही खाऊ शकतात.

 

नाश्त्यासाठी उपमा या पदार्थाचे सेवन करू शकता. उपमा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. पचनसंस्थेला फायबरयुक्त पदार्थ पचवणे सोपे जातात. उपमा हा पदार्थ खाल्याने शरीरात ऊर्जा मिळते.

बडीशेपही मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे. रोज बडीशेप खात असल्यास त्याचा फायदा होतो. कारल्याचा रसही साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करतो. दररोज कारल्याचा रस प्यावा. सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो, काकडी आणि कारल्याचा रस घेतल्यास फायदा होतो.

मधुमेहच्या रुग्णांनी रोज सकाळी ज्वारीचा रस पिल्याणे आहारास मदत होते. कडुनिंबाच्या पानांचा रसही यावर लाभदायी ठरतो. तसेच भेंडीची भाजी खाल्याने मधुमेह वर नियंत्रित राहते. भेंडी सोबतच मेथीचा भाजीचा ही समावेश करावा.

रोज सकाळ संघ्याकाळ उकडलेल्या अंडीचा वापर आहारामध्ये करणे.यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

हे ही वाचा :

उद्या गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त

 

Latest Posts

Don't Miss