spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आरोग्यासाठी गुणकारी आल्याचे फायदे

आल्याचा वापर रोजच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो.

आल्याचा वापर रोजच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. आले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंडीमध्ये आल्याचा वापर जास्त केला जातो. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठीही आल्याचा वापर केला जातो . आले हे जमिनीमध्ये कंद मुळाचा स्वरूपात आढळते. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असते. पचनक्रिया चांगली आणि निरोगी ठेवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आले हे खोकला घालविण्यासाठी खाल्ले जाते तसेच अनेक औषधांमध्ये वापरले जाते. तसेच आल्याचे काही औषधी गुणधर्मी फायदे देखील आहेत.

हे ही वाचा :अचानक आलेल्या पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस

 

 

आल्याचे फायदे –

खोकला आणि सर्दी जाण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. गरम पाण्यामध्ये आलं ,लवंग, तुळशीचे पाने, घालून एकत्र करून काडा बनवून सर्दी आणि खोकला यावर उपयुक्त ठरतो. आल्याचा चहा घसा खवखवणे आणि सर्दीसाठी खूप फायदेशीर असते. सर्दी व कफवर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. मधूमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा.

आल्यामुळे वजन नियंत्रित राहते. आल्याचे चयापचय आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करण्यास त्रास होत असेल त्यांनी आल्याचे सेवन केले पाहिजे.

 

सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा किंवा मळमळल्यासारखे होते असेल तर तुम्ही आल्याचा वापर करू शकता. सकाळ – संघ्याकाळ आल्याचा चहा पिणे. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

आल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहावरही नियंत्रण ठेवण्यात येते. आल्याचा गुणधर्मामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया उत्तम राहते. कधीही पोटदुखी झाल्यास तुम्ही आल्याचा रस पिऊ शकता.

आल्याचा वापर केसांसाठी ही केला जातो. केस वाढण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो.

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी आल्याचा रस पिणे उपयुक्त ठरतो.

आल-लसणाची पेस्ट जेवणामध्ये वापरली जाते. त्यामुळे जेवणाला मस्त टेस्ट येते.

हे ही वाचा :

जागतिक फिजिओथेरपी दिन २०२२: फिजिओथेरपीद्वारे तुम्हाला मिळू शकतो अनेक आजारांपासून आराम

 

Latest Posts

Don't Miss