spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोड आलेले मुग खाणे आरोग्यासाठी उपयुक्त

कारण मूग मध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, इ यांचे प्रमाण जास्त असते.

रोज सकाळी उठल्यावर मोड आलेले मूग खाणे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. मुग डाळ ही आरोग्यासाठी पौष्टिक मानली जाते. कारण मूग मध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, इ यांचे प्रमाण जास्त असते. मुगाचे सेवन केल्यास शरीरातील फॅट कमी होते तसेच वजन संतुलित राहण्यास देखील मदत होते. आणि भूक सुद्धा लागत नाही त्याचप्रमाणे खाण्यात नियंत्रण राहते. त्यामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. मूग कडधान्यापासून आपल्याला भरपूर पोषक द्रव्य मिळते. रोजचा आहारामध्ये कडधान्याचा समावेश केला जातो.

मोड आलेले मूग खाण्याचे फायदे –

  • मोड आलेले मूग खाल्यास शरीरातील विषारी पदार्थ – द्रव्य कमी करण्यास मदत करते. तसेच पचनक्रिया ही चांगली राहते.
  • मूग खाल्यास अन्न हलक ही होते आणि सहज पचन होते.
  • मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते.
  • मूग खाल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने मिळते.
  • मोड आलेल्या मुगामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
  • मुगामध्ये मुबलक प्रमाणात सी हे व्हिटॅमिन असते. त्यामुळे केसांच्या समस्यापासून मुक्तता मिळते.
  • अशक्तपणा असल्यास मोड आलेल्या मुगाचे सेवन करावे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.
  • सकाळी उपाशी पोटी मुगाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी चांगले असते आणि रक्त वाढण्यास मदत देखील होते.
  • तुमची त्वचा चिकट किंवा कोरडी असेल किंवा तुम्हाला त्वचेवर ताजेपणा आणि टवटवीपणा पाहिजे असेल तर तुम्ही मुगाचे सेवन करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

विराट कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ७१वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले

नाशिकमधील अतिवृष्टीमुळे खान्देशच्या गिरणा धरणाचे दरवाजे उघडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss