spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, एका बंद लिफाफ्यातून हे पत्र किशोरी पेडणेकर यांना हे धमकीचं पात्र पाठवण्यात आले आहे.

राज्यात सध्या राजिक्य घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी पत्र लिहलं आहे. त्यामुळं सत्ताबदलाच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. उद्या नेते एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह मुंबईत परत येणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बरंच तापलं आहे. शिवसेनेचे बहुसंख्य मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यामुळे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. दरम्यान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, एका बंद लिफाफ्यातून हे पत्र किशोरी पेडणेकर यांना हे धमकीचं पात्र पाठवण्यात आले आहे. लवकरच या पत्राविरुद्ध कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात, सरकार पडू देत मग बघून घेऊ असं असं म्हणण्यात आलं आहे. सोबतच या पत्रात अश्लील भाषेत शिवीगाळ ही करण्यात आली आहे. धमकीच्या या पत्रात अजित पवारांचा ही उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांनीच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांना मारू अशी धमकी देण्यात आली आहे. सोबतच किशोरी पेडणेकर यांच्या फोटोवर काट मारण्यात आली असून तो फोटोही या पत्रात चिकटवण्यात आला आहे. विजेंद्र म्हात्रे असे पत्र पाठवणाऱ्याचे नाव असून जय महाराष्ट्र सायबर कॅफे, उरण रायगड येथून पाठवण्यात आल्याचे समजते.

किशोरी पेडणेकर यांना याआधीही धमकीचे पत्र आले होते त्या पत्रातही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्यानंतर त्यांना आलेले हे धमकीचे तिसरे पत्र आहे. अजित पवार यांनी हे सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख असल्याने खळबळ माजली आहे. तसंच या प्रकरणामुळे अजित पवारांविषयीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss