बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अजयसोबतच सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, या चित्रपटामध्ये अजय हा चित्रगुप्त ही भूमिका साकारत आहे. अजय हा सिद्धार्थसोबत ‘गेम ऑफ लाईफ’ खेळणार आहे, असंही ट्रेलरमध्ये दिसत आहे.
एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’चे नियोजन
ट्रेलर कसा आहे ?
थँक गॉड चित्रपटाच्या ३ मिनिटे ९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यामध्ये मजेशीर संवाद सुरु असल्याचे दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला सिद्धार्थ मल्होत्राचा म्हणजेच आयानचा अपघात होतो. तो जीवन आणि मृत्यूशी झुंज देत असतो. त्यानंतर तो चित्रगुप्तला भेटतो. चित्रगुप्तची भूमिका अजय देवगण साकारत आहे. चित्रगुप्त आयानला त्याने कलेल्या चुका, त्याचा राग, त्याची कमकुवत बाजू आणि इतर गोष्टी दाखवतो.
हेही वाचा :
या चित्रपटा अजय देवगण ह्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘या दिवाळीत तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय चित्रगुप्ताकडे गेम खेळण्यासाठी येत आहात, ट्रेलर उद्या येईल, चित्रपट २५ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल’.अजयचे चाहते आता दिवाळीची वाट पाहत असतील. थँक गॉड हा रोमँटिक-कॉमेडी-ड्रामा प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून त्यांनी ‘मस्ती’ चित्रपटाप्रमाणे ‘टोटल धमाल’ हा चित्रपट बनवला आहे.
View this post on Instagram
शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार; सुप्रिया सुळे
याआधी अजय देवगण स्वतःच्या प्रोडक्शनच्या ‘रनवे-३४’ चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याच्यासोबत अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल चित्रपटाने केली नव्हती.