राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ माझगाव मुंबई येथे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहकुटुंब सहभागी झाले.
यावेळी त्यांनी कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याच्या भावना व्यक्त केल्या यावेळी माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ व अखिल अंजीरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.