spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डोळ्याच्या समस्या दूर ठेवण्यासाठी घरगुती उपाय

सध्याचा काळात डोळ्यातील समस्या जास्त वाढत चाले आहेत.आजकाल खूप लोकांना चष्मा लागताना दिसत आहे. लहान,मोठ्या तसेच मध्यम वयातील लोकांना ही देखील चष्मा लागताना दिसत. आणि वयानुसार डोळे कमजोर होणे डोळ्यात जळजळ होणे डोळ्यातून पाणी येणे व मोतीबिंदू होणे यासारखे आजार होतात. हे आजार कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. आजकाल चा जगात लॅपटॉप आणि कॉम्पुटरचा जास्त वापर केला जातो ह्या सवयी बदलण्यासाठी तुम्हाला तुमचा आहारामध्ये बदल केला पाहिजे. त्यामुळे तुमचे डोळ्याचे आरोग्य सुधारू शकते.

हे ही वाचा :व्हिटॅमिन-डी सप्लिमेंटेशन तुम्हाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवू शकत नाही

 

डोळ्याचे आरोग्य चांगले करण्यासाठी तुम्ही गाजराचा रस पिऊ शकता. गाजर हे आरोग्याचा द्रुष्टीने खूप फायदेशीर आहे. गाजर मध्ये ए व्हिटॅमिन असते. त्यामुळे गाजराचा रस तुमच्या डोळ्यांसाठी उपयोगी ठरेल.

हिरव्या पालेभाज्या रोज सेवन केल्यानी शरीरातील रक्तवाढीस मदत होते. आणि डोळ्याचा आरोग्यासाठी ही पालेभाज्या उपयुक्त असतील. पालेभाज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. जे मोतीबिंदू चा धोका कमी करण्यास मदत होते.

 

राईच्या तेलाचा वापर आपण रोजचा आहारामध्ये ही केला जातो. राईचे तेल गरम करून रोज रात्री केसांना आणि तळपायांना लावल्यास डोळयातील आरोग्य चांगले राहते.

बदाम खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बदामामध्ये व्हिटॅमिन असल्याने त्याचा वापर डोळ्याचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो.डोळ्यातील नंबर कमी करण्यासाठी तुम्ही फोन टीव्ही लॅपटॉप याचा वापर कमी प्रमाणात केले पाहिजे. आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिले पाहिजे आणि आहार वेळोवेळी केला पाहिजे ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. आणि डोळ्याचा आरोग्यासाठी ही चांगले ठरते.

हे ही वाचा :ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर, भारतात एक दिवसाचा शोक पाळण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

 

Latest Posts

Don't Miss