spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लहान मुलांचे मन का जपले पाहिजे ?

मुलांना जर सतत मारत राहिले, तर ते त्यांच्या मनातील भिती वाढते आणि ते चुका करण्याची जास्त शक्यता असते

लहान मुलांची मने खूप नाजूक आणि हळवी असतात. त्यामुळे लहान मुलांना जपणे गरजेचे असते. लहान मुलांसाठी पालक हे आदर्श असतात. मुले चुकल्यानंतर लहान मुलांना पालक मारतात ओरडतात यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. मुले कोणताही विचार करतात. त्यामुळे लहान मुले डिप्रेशनमध्ये देखील जातात. मुलांना जर सतत मारत राहिले, तर ते त्यांच्या मनातील भिती वाढते आणि ते चुका करण्याची जास्त शक्यता असते. जास्तीत जास्त काय तर मार दिला जाईल असा विचार करुन ते पुन्हा चुका करतात. यामुळे मुलं सुधारण्याऐवजी आणखी जास्त बिघडण्याचा धोका असतो. मुलांना प्रत्येकवेळी मारून त्यांच्यासोबत भांडून काही होत नाही. त्यांना समजणे त्यांच्याशी प्रेमाने बोलणे देखील गरजेचे असते.

मुलांना जर प्रत्येक गोष्ट मारुनच समजावली, तर त्यांच्यातील बंडखोरी वाढते आणि एखादी गोष्ट करु नको म्हंटल्यास ते मुद्दाम करतात. त्यामुळे पालकांच्या प्रत्येक गोष्टीला ते विरोध करून बंडखोरी करतात.

पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे. त्यांच्यासोबत गप्पा-गोष्टी केल्या पाहिजे. त्यांचा रोज अभ्यास घेतला पाहिजे. त्याच बरोबर नृत्य करणे त्यांना फिरायला घेऊन जाणे. या गोष्टी आई -वडिलांनी मुलांकडून करून घेतल्या पाहिजे.

आपल्या मुलांना नेहमी याची जाणीव करून द्या की तुम्ही त्यांच्या सदैव सोबत आहात. आपल्या पालकांचा सहवास मुलांसाठी सर्व काही असतो. त्यांच्या सहवास मुलांना आनंद मिळतो. यामुळे मुले सुद्धा मोकळेपणाने पालकांशी संवाद साधतात. मुलांना या गोष्टीची जाणीव करून द्या की काहीही समस्या असल्यास ते तुमच्याशी शेअर करू शकतात.

आई वडिलांचे नाते मुलांसोबत फ्रेंडली असावे. काही मुले आपल्या आई -वडिलांना बघूनच खुश होतात. मुलाच्यासमोर आई-वडील एकमेकांसोबत भांडण करतात त्याचा परिणाम मुलांच्या डोक्यावर होतो. आणि ते नको नको ते विचार करत बसतात. आणि मुलांना त्यांची चिंता वाटू लागते. त्यामुळे शक्यतो मुलांसमोर भांडू नका. मुले जर खुश पाहिजे असतील तर तुम्ही एकमेकांसोबत खुश राहिले पाहिजे.

हे ही वाचा:

ब्रह्मास्त्र झाला जगभरात सुमारे ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर होणार ‘इतक्या’ कोटींची कमाई

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss