spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बडा कब्रस्तान प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर निशाणा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो समोर आणत सेनेचा पलटवार

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातबडा कब्रस्तानचे प्रकरण खूप जास्त गाजत आहे. त्यात आता राजकीय पक्षांनी देखील सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बडा कब्रस्तानचे प्रकरण खूप जास्त गाजत आहे. त्यात आता राजकीय पक्षांनी देखील सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या नेत्यांकडून आता एक नवा व्हिडीओ जारी केला आहे. मुंबईच्या माजी महपौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर असताना याकूब मेमनचे नातेवाईक रऊफ मेमन सोबत बडा कब्रस्तान येथे बैठक झाल्याचा मोठा आरोप भाजपाने केला आहे.

 तसेच याकूब मेमनच्या कबरीच्या (Yakub Memon) सजावटीसाठी टायगर मेमनच्या (Tiger Memon) नावाची धमकी देणाऱ्या रऊफ मेमनसोबतच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) भाजपवर (BJP) जोरदार पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांचा फोटो ट्वीट केला आहे.

मुंबईतील बडा कब्रस्तान येथे याकूब मेमनची कबर आहे. या कबरीची सजावट केल्याचे समोर आले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किशोर पेडणेकर आणि रऊफ मेमनसोबतच्या बैठकीतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी किशोरी पेडणेकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ज्या याकूब मेमनने १९९३ च्या बॉम्बस्फोटात केलेल्या प्रकरणात गुन्हेगार असलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांसोबत बैठक कश्या करू शकतात? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी तिथं गेलं होते. चर्चा करताना अनेक लोक तिंथ होते. त्यामुळे गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. बैठकीत कोण उपस्थित होते मला माहिती नाही. मी जैन मंदिरात गेले गुरुद्वाराला गेली सर्व ठिकाणी गेले. वेगवेगळ्या काणांसाठी मी जाते. जातपात न बघता कामासाठी मी जात होती. तिथ अनेक लोक होते. ते कोण आहेत मला माहीत नाही. भाजपकडून वेगवेगळ्या गोष्टींची लिंक लावून फोटो व्हायरल करते. मी कधीच कोणाला तुम्ही कोण असं विचारत नाही. जातिभेद करत नाही. मी कामाच्या ठिकाणी जावून फक्त कामच केली. शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप भाजपकडून केले जात आहेत असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत. हे राजकारण आहे. आगामी निवडणुकाच्या काळाच्या पार्श्वभूमीवर हे आरोप केले जात आहेत. आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ असे देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि टायगर मेमन, दाऊदच्या संबंधाच्या चौकशीची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील दिसत आहेत. तर आता काँग्रेसने देखील या वादात उडी घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा फोटो शेअर करत सावंत यांनी रऊफ मेमन ते हेच का? असा प्रश्न केला आहे.

हे ही वाचा:

याकूब मेमन देशद्रोही कसा बनला

समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या, अमित ठाकरे सह सेलेब्रिटींनीही घेतला पुढाकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss