spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, गडकरींनी दिला शेतकऱ्यांना सल्ला

सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो.

आज विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी भाजीपाला व फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला यावेळी गडकरी ( Nitin Gadkari) यांनी शेतकऱ्यांना दिलाय.

स्वतःच्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले, याचे उदाहरण उपस्थितांना सांगताना गडकरी यांनी सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे मत व्यक्त केले. तसेच आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही असेही गडकरी यावेळी म्हणाले.

“सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या”, असा सल्ला नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.

आपल्या नवनवीन आणि रोकठोक वक्तव्यांमुळे नितीन गडकरी नेहमीच चर्चेत असतात आणि आता त्यांनी नव्याने केलेले हे वक्तव्य देखील आता राजकीय वर्तुळात एक चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष? सोनिया गांधींनी घेणार मोठा निर्णय

मुंबईच्या प्रभादेवीमध्ये भीषण आग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss