spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार वाद, सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena Vs Shinde Group) हे वाद सुरु आहेत पण आता हे वाद हळू हळू वाढू लागले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena Vs Shinde Group) हे वाद सुरु आहेत पण आता हे वाद हळू हळू वाढू लागले आहेत. मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर मध्यरात्री पुन्हा मोठा वाद झाला. दोन्ही गटात जोरदार हाणामारी देखील झाली.

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटानेदेखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटाच शाब्दिक वाद देखील झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. या राड्याप्रकरणी दादर पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मध्यरात्री सुरू झालेल्या राड्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पडदा पडला. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनबाहेर पडले. राड्याच्या घटनेमुळे प्रभादेवीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.

शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. संतोष तेलवणे हे शिंदे गटात गेल्यानंतरच शिवसैनिकांमध्ये संताप होताच. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या संतापात अधिकच भर पडली. तेलवणे प्रकरणानंतर शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. त्याशिवाय पोलिसांशीदेखील हुज्जत घातल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व घटनांनंतर दादर पोलिसांनी दोन्ही गटाच्या काहीजणांना ताब्यात घेतले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यरात्री पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.

हे ही वाचा:

देशभक्त दिवस २०२२: अर्थ, महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत

राष्ट्रीय वन शहीद दिन: इतिहास, महत्त्व आणि उत्सव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss