spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – 11 September 2022 – कला गुणांना संधी उपलब्ध…

तुमच्या राशीतून होणारे राहूचे भ्रमण आळसी वृत्ती वाढवू शकेल. त्यावर उपाय म्हणून पूर्वजांच्या तृप्तीसाठी धर्मोचित कार्यामध्ये सहभागी व्हा.

मेष : तुमच्या राशीतून होणारे राहूचे भ्रमण आळसी वृत्ती वाढवू शकेल. त्यावर उपाय म्हणून पूर्वजांच्या तृप्तीसाठी धर्मोचित कार्यामध्ये सहभागी व्हा. मांगलिक कार्य अथवा गरजुंना मदत करण्याची मानसिकता निर्माण होईल. वातावरण बदलाने होणारे विकार शारीरिक कमजोरी निर्माण करू शकतात. विभक्त कुटुंब पद्धतीने जगण्याची मानसिकता निर्माण होईल.

वृषभ : तुमच्या कला गुणांना संधी उपलब्ध होतील. व्यावसायिक क्षेत्रात अधिक अभ्यास करून अनुभव घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या व्यावहारिक अज्ञानामुळे कोणीतरी फायदा उठवू शकेल. परदेश गमनाबद्दल करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. न्यायालयीन लढाईत यश मिळण्यासाठी आवश्यक कागद पत्रांची जुळवाजुळव करण्यास आजचा दिवसभर व्यस्त रहाल.

मिथुन : आपल्या वाणीने कोणाला दुःख होणार नाही याबाबत काळजी घ्या . वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. डोकेदुखी किंवा मेंदूचे विकार असल्यास योग्यवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अन्नातून विषबाधा होणे किंवा बाहेरची बाधा होणे अशा घटना आपणांस विचलित करू शकतात. श्री रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने बरे वाटेल.

कर्क : आप्तेष्टांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे आपली पत वाढेल . तरीहि आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी ऐकायला मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्या शिष्य वर्गाकडून केली गेलेली आदरयुक्त स्तुती ऐकायला मिळेल.

सिंह : नेत्रदीपक यशाकडे तुमची वाटचाल सुरु होईल. सरकार दरबारी असलेल्या तुमच्या पादप्रतिष्टेवर कोणीतरी शाब्दिक शिंतोडे उडवण्याची शक्यता आहे. विरोधकांवर आपण आपल्या शब्द प्रहाराने तुटून पडाल. जवळच्या व्यक्तीवर विसंबून राहून कोणतेही निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कन्या : आज उचललेल्या प्रत्येक पावलांची इतरांनी नोंद घ्यावी अशीच स्थिती असेल. तुमच्या कला गुणांची सर्वत्र वाखाणणी होईल. राजकीय क्षेत्रांत कार्यरत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी संस्मरणीय ठराव असाच असेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत आर्थिक जबाबदारी घेणे टाळा. अथवा कोणालाही हात उसने किंवा कर्जाऊ रक्कम देऊ नका.

तुळ : तुमच्या शब्दाचा गैर अर्थ लावला जाऊ शकतो. जर आपणास रक्तदोष किंवा मधुमेह असेल तर आज तुम्ही शारीरिक बदलाची नोंद घेऊन उचित उपचार घेण्याची गरज वाटते. दूरच्या प्रवासाचे बेत आखताना आपल्या शारीरिक स्थितीचा जरुर विचार करावा. आपण जर इमारत निर्माण व्यवसायात असाल तर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे राहील.

वृश्चिक : कौटुंबिक जीवनात मनोमन आनंदी रहाल . तुमच्या ज्येष्ठ मंडळींनी तुमच्यावर दाखविलेला विश्वास तुमच्या जीवनासाठी प्रेरणादायी असेल. कुणाच्याही विषयी न्याय निवाडा करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी जरूर घ्या. व्यावसायिक भागीदाराकडून आर्थिक फायदा होऊ शकेल. कुटुंबातील व्यक्तींना वेळ देऊ शकाल.

धनु : सामाजिक जीवनात तुम्ही विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सुख लाभेल. बऱ्याच काळापासून रेंगाळत पडलेले विषय मार्गी लावण्यासाठी संधी उपलब्ध होतील. आपण आज केलेली आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी लाभदायक ठरू शकेल. प्रवास केल्याने दगदग जाणवेल. वाहन खरेदी सारखे विषय थोड्या काळासाठी लांबणीवर टाकावेत.

मकर : आपण नियोजन केल्याप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर इष्ट गतीने वाटचाल कराल. तुमचे सहकारी तुम्हाला योग्य पद्धतीने सहकार्य करतील. तुमच्या कर्तृत्वाच्या चर्चा सर्वसामान्य माणसापर्यंत चर्चिल्या जातील. शक्य तेवढी कामे सकाळच्या सत्रात उरकून घेण्याचा प्रयत्न करा. हित शत्रूंचा सुळसुळाट पूर्णत्वास जात असलेल्या कामास बाधक ठरू शकतो.

कुंभ : आजचा दिवस आपणांस समृद्धीकडे घेऊन जाणारा आहे, अचानक धनलाभ होऊ शकेल. जुने येणे वसूल होऊ शकेल. परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे कार्यपूर्ती होऊ शकेल. डोळ्याचे विकार असल्यास उपचाराने बरे वाटेल. तुमच्या भावंडांकडून उत्तम सहकार्य मिळेल.

मीन : आज आपणास अध्यात्मिक शक्तीची दिव्य अनुभूती येऊ शकेल. समाज मनावर तुमच्या सहज वागण्या बोलण्याचा प्रभाव पडेल. सद्गुरूच्या प्रेरणेने जीवनाचा प्रवास सुखाच्या वाटेने सुरु राहील. पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. तुमच्यातील उत्तम गुणांचा इतरांना उपयोग होईल. जमीन विषयक महत्वाचे निर्णय अंतिम टप्यात येतील.

हे ही वाचा:

Pitrupaksh shradh 2022 :- जाणून घ्या… श्राद्धाचे अनेक प्रकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss