spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

JEE Advanced 2022 : आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात प्रथम

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ने आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ने आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अँडव्हान्स २०२२ ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली. उमेदवार लॉगिन क्रेडेंशियल्स- ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड वापरून JEE Advanced 2022 फायनल आंसर की देखील ऍक्सेस करू शकतात. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या JEE Advanced 2022 साठी १. ५६ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

JEE Advanced 2022 निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात प्रथम आला आहे. आर.के. शिशिरने ३६० पैकी ३१४ गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. आयआयटी मुंबई झोनचे २९ विद्यार्थ्यांनी देशातील टॉप १०० मध्ये स्थान पटकावले आहे. तर आयआयटी दिल्ली झोनची तनिष्का काबरा ही देशातून मुलींमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

२८ ऑगस्ट रोजी जेईई एडव्हान्सची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ १,५५,५३८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यातील ४.,१७२ विद्यार्थी हे पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे. या परीक्षेत ३६० पैकी ५५ गुण हे पात्रतेसाठी आवश्यक आहे. त्यानुसार हे ४०,१७२ विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. ही परीक्षा १२४ शहरांमध्ये ५७७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. २३ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये एकूण १६,५९८ जागा आहेत, ज्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जागांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी १,५६७ अतिरिक्त जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा: –  JEE-Advance चा निकाल जाहीर

IIT मुंबई झोन मधील देशातील (टॉप २०) मध्ये येणाऱ्या टॉपर्सची नावे –

आर. के. शिशिर – रँक १
प्रतीक साहू – रँक ७
माहीत गढीवाला – रँक ९
विशाल बयसानी – रँक १३
अरिहंत वशिष्ठ – रँक १७

निकाल असा डाउनलोड करा

  • सर्व प्रथम, JEE Advanced च्या jeeadv.ac.in अधिकृत साईटला भेट द्या.
  • यानंतर, उमेदवार होम पेजवर उपलब्ध JEE Advanced 2022 Result वर क्लिक करा.
  • नंतर उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा
  • उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.

हे ही वाचा:

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात आज औरंगाबादमध्ये शिक्षकांचा भव्य मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss