spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

J&K Terrorist Attack: मागील तीन दिवसांत आठ जवान शहिद, PM Narendra Modi, Amit Shah देशाला भ्रमित करत आहेत; Sanjay Raut यांची टीका

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज (मंगळवार, ९ जुलै) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले.

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज (मंगळवार, ९ जुलै) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. केंद्र सरकारवर (Central Government) टीका करत ते म्हणाले, “प्रधानमंत्री जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्ह जवान शहीद झाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा या देशाला भ्रमित करत आहेत,” अश्या शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर हल्लाबोल केला.

जम्मू आणि काश्मीर मध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “पाच जवानांच्या हत्या झाल्या आपण त्याला बलिदान म्हणूया किंवा हुतात्मा म्हणूया, पाच जवानांवर ज्या प्रकारे हल्ला झाला हे सरकार आल्यापासून गेल्या एक महिन्यात एकूण सात हल्ले जवानांच्या ताफ्यावर झाले आहेत. प्रधानमंत्री जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्हाही जम्मू कश्मीर मध्ये जवानांवर हल्ले झाले आणि त्यात जवान शहीद झाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा या देशाला भ्रमित करत आहेत. खोटं बोलत आहेत कि जम्मू-काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे शांतता नांदते. पण ३७० कलम हटवल्यापासून जम्मू कश्मीर मध्ये अधिक अस्थिरता आणि अशांतता निर्माण झाली आहे.”

पुढे ते म्हणाले, “जम्मू काश्मीरच्या विधानसभेला अद्याप टाळे लागलेला आहे. जम्मू कश्मीरच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत हे कसलं लक्षण आहे. देशाचे प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर आहेत, शपथ घेतल्यापासून ते कधी इटलीला असतात, कधी रशियाला असतात आणि देशातले आमचे जवान येथे शहीद होत आहेत. मणिपूर आणि जम्मू कश्मीर हे दोन्ही राज्य जणू भारताच्या नकाशावर नाहीत अशा पद्धतीने देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री काम करत आहेत. जे पाच जवान शहीद झाले त्यांना कीर्ती चक्र अशोक चक्र तुम्ही प्रदान कराल पण शेवटी बलिदान नसून या हत्या आहेत. या हत्यांना प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग जबाबदार आहेत. पुलवामा मध्ये 40 जवान शहीद झाले ते का शहीद झाले त्याचा तपास अद्याप लागू शकला नाही. आरडीएक्स कुठून आलं, ४०० किलो आरडीएक्स पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलं हे कुठून आलं हा शोध हे अद्याप लावू शकत नाही ते देशावर राज्य करत आहेत,” असे ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर येथील कठुआ येथे काल (सोमवार, ८ जुलै) दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांच्या वाहनावर ग्रेनेड्सने हल्ला केला. या हल्ल्यात पाच सैनिक शाहिद झाले असून पाच जवान जखमी झाले आहेत. याआधी रविवारी (७ जुलै) दहशतवाद्यांनी राजौरी येथे आर्मीपोस्टवर हल्ला केला होता. त्यात २ जवान जखमी झाले होते. गेल्या तीन दिवसातील हि तिसरी घटना असून यात भारतीय सेनेचे आठ जवान शाहिद झाले आहेत.

Latest Posts

Don't Miss