spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गोड खायचं मन करतय, तर बनवा भोपळ्यापासून बनारसी हलवा

हलवा हा पदार्थ विविध प्रकारे बनवला जातो आणि हा गोड पदार्थ अनेकांना खायला आवडतो. आज आम्ही तुम्हाला भोपळ्यापासून बनारसी हलवा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही आत्ता हलवा, सुजी हलवा, गाजर, मूग हलवा तर कधी खाल्ला असेल, पण बनारसी हलवा कधी चाखला आहे का? जर नसेल तर आमची रेसिपी तुम्हाला घरी बनरसी हलवा बनवायला खूप मदत करेल.

चविष्ट बनारसी हलवा तयार करण्यासाठी भोपळा आणि माव्यासोबत दूध आणि सुका मेवाही लागतो. ज्या लोकांना मिठाई आवडते त्यांना बनारसी हलव्याची चव आवडेल. चला तर जाणून घ्या चविष्ठ बनारसी हलवा बनवण्याची सोपी पद्धत.

हेही वाचा : 

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या ९९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बनारसी हलवा भोपळा बनवण्यासाठी साहित्य :

२ कप साखर ३/४ कप
देशी तूप – १/२ कप
मावा (खोया) – ३/४ कप
दूध ३ कप
बदाम – १४-१५
काजू – १४-१५
वेलची पावडर – १/२ टीस्पून

बनारसी हलवा बनवण्याची कृती :

बनारसी स्टाईल हलवा बनवण्यासाठी प्रथम एक भोपळा घ्या आणि तो कापून घ्या आणि मऊ लगदा काढा आणि नंतर वरची त्वचा काढून टाका. यानंतर भोपळ्याचे तुकडे बारीक करून मिक्सरमध्ये टाकून गुळगुळीत पेस्ट तयार करा. यानंतर काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून बाजूला ठेवा. आता एका पातेल्यात दूध घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. नंतर दूध गरम करताना चमच्याने अधूनमधून ढवळत रहा. दूध उकळायला लागल्यावर त्यात तयार भोपळ्याची पेस्ट घालून मिक्स करा. त्यानंतर शिजू द्या. लक्षात ठेवा की ते ढवळत राहा नाहीतर भोपळ्याची पेस्ट पॅनला चिकटू शकते. खीर घट्ट व्हायला लागली की गॅस बंद करा.

‘ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है’ खा.श्रीकांत शिंदेची विरोधकांवर टीका

आता दुसरी पॅन घ्या, तूप घाला आणि मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळले की त्यात ड्राय फ्रूट्स तळून प्लेटमध्ये काढा. आता मावा घालून तुपात तळून घ्या. थोड्या वेळाने चवीनुसार साखर घालून शिजू द्या. १-२ मिनिटे शिजल्यानंतर आच मंद करा आणि त्यात दूध-भोपळ्याचे घट्ट मिश्रण घालून मिक्स करा. चांगले मिसळा आणि खीर शिजू द्या. शेवटी ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड मिक्स केल्यावर गॅस बंद करा. चविष्ट बनारसी हलवा तयार आहे. एका भांड्यात ठेवा आणि ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न, सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Time Maharashtra |Marathi news

Latest Posts

Don't Miss