spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

या’ दिवशी होणार रामदास कदम यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरेंची सभा

शिवसेनेत फूट पडल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Additya Thackre) बंड केलेल्या आमदारांच्या आणि नेत्यांच्या क्षेत्रांमध्ये सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात, ठाण्यामध्ये सभा घेण्यात आली. आता आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाण्याची माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे हे १६ सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. रामदास कदम (Ramdas Kadam) आणि आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या बालेकिल्ल्यात मध्येही सभा होणार आहे अशी माहिती मिळत आहे. सूर्यकांत दळवी यांनी यावेळी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सध्या राजकारणात उलथापालथ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा समाचार घेण्यासाठी आणि बंडखोरीची कीड गाडण्याचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं असल्याचे सूर्यकांत दळवी म्हणाले.

मुंबई विमानतळावर १२ प्रवाश्यांना सोन्याची तस्करी करताना रंगे हात पकडल

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जायचा पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला कोकणात मोठी पोकळीक निर्माण झाली आहे. हीच पोकळीक भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. १६ सप्टेंबरला आदित्य ठाकरे यांच्याकडून रामदास कदम व आमदार योगेश यांनी केलेल्या गद्दारीलाही उत्तर दिले जाईल. या सभेत आदित्य ठाकरे यांच्याकडून जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर आझाद मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. काही महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा झाली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी वर्तवला आहे.

या वेळी सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम यांचे गट आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी सूर्यकांत दळवी यांच्याकडून करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असलेले आदित्य ठाकरे दापोली मतदारसंघात काय बोलणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आता आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या निमित्तानं काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या ९९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रणवीर सिंगने पुष्पा मधील अल्लू अर्जुनचे श्रीवल्ली गाणे केले ‘रिक्रिएट’, SIIMA 2022 च्या मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss