spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोकण रेल्वेने घेतला मोठा निर्णय; आता कोकणवासीयांच्या प्रवास होणार पर्यावरणपूरक आणि वेगवान

येत्या १५ सप्टेंबरपासून रेल्वे विद्युत इंजिनसह धावणार आहेत.

कोकणवासियांना आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुश करणारा एक निर्णय आता कोकण रेल्वेने घेतला आहे. कोकण रेल्वेने घेतलेला हा निर्णय फक्त प्रवाशांसाठीच नव्हे तर पर्यावरणासाठीदेखील महत्वाचा आहे. कारण, कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार येत्या १५ सप्टेंबरपासून रेल्वे विद्युत इंजिनसह धावणार आहेत. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत.

कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण मागील सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर मालगाड्या आणि एकमेव प्रवासी गाडी सोडली तर सर्व प्रवासी गाड्या डिझेल इंजिनसह धावत आहेत. मात्र, आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस (ट्रॅक्शन सबस्टेशन) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने रेल्वेने 15 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या विद्युत इंजिनसह धावणार

  • १५ सप्टेंबर २०२२ – दादर सावंतवाडी तुतारी, मंगला एक्सप्रेस आणि मडगाव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडी
  • २० सप्टेंबर २०२२ – मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस
  • १५ ऑक्टोबर २०२२ – जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी ते करमाळी तेजस
  • ०१ जानेवारी २०२३ – मुंबई मंगलोर (मंगळुरू) एक्सप्रेस

हे ही वाचा:

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलू न दिल्यामुळे अजित पवार नाराज

गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन सुषमा अंधारेंकडून नवनीत राणांचा खरपूस समाचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss