spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sharad Pawar यांच्यावर आरोप करण्याआधी तुम्ही OBC आणि…काय म्हणाले Vinayak Raut?

माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची रत्नागिरी (Ratnagiri) येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असल्याचे वक्तव्य केले. नाना पटोले (Nana Patole) यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काँग्रेस (Congress) च्या अंतर्गत बाबींवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. काँग्रेसचा वरिष्ठ नेतृत्व यासाठी सक्षम आहे. काही मतभेद असतील तर ते मिटवले जातील.

लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलेल्या आरोपाबद्दल विनायक राऊत म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीमागे लाखोंच्या संख्येने मराठा समाज आहे. भाजपच्या टोळीने याचा संबंध महाविकास आघाडीशी जोडला आहे. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. १६ जुलै रोजी शंकराचार्य यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कुटुंबियांची भेट घेऊन आशीर्वाद दिले. याबाबत विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना शंकराचार्य यांनी आशीर्वाद दिले आहेत. त्यांचे शब्द खरे ठरु दे ही माझी प्रार्थना आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत ते म्हणाले की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेतून त्यांनी वक्तव्य केले असल्याचे मत राऊतांनी व्यक्त केलं. तिसरी आघाडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, या वेळेला तिसरी आघाडी करू किंवा चौथी आघाडी करू, इंडिया आघाडी या वेळेला एकत्र लढतील आणि सरकार देखील स्थापन करतील. हर्षवर्धन पाटीलच्या मुद्दयावर विनायक राऊत म्हणाले की, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. पाक व काश्मीर इथे असेल तर तुमचं सरकार होतं तुमचं सरकार आहे त्यांनी याचा शोध घ्यावा. प्रामाणिकपणे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानची करणं हा मूर्खपणा आहे. गिरीश महाजन यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर विनायक राऊत म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करण्याआधी तुम्ही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दुही पसरवण्याचे काम केलं त्याचं आधी उत्तर द्या, असे विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेची तांत्रिक अडचण होणार दूर ; राज्यसरकारने केले काही नवे बदल

डोंबिवलीहून निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा Mumbai Pune Express Way वर भीषण अपघात; ५ ठार, आठ गंभीर जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss