वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं आहे. मनोरमा खेडकरसह पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक पौड पोलिस ठाण्यात दाखल झालं असून मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातल्याचे पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांच्या जुन्या व्हिडिओ व्हायरल झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज १८ जुलै रोजी अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुणे येथे घेऊन आले आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे.
पुण्यातून वाशीम येथे ट्रान्सफर झालेल्या पूजा खेडेकर यांच्यावर केंद्र सरकारने (Central Government) चौकशी समिती बसवली असताना आता पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Pooja Khedkar Mother Viral Video) झाला होता. व्हिडिओमध्ये पूजा खेडेकर यांच्या आई शेतकऱ्यांसोबत वाद घालताना दिसली होती. त्यांच्या हातात पिस्तूलही असल्याचे पाहायला मिळाले होते. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे पूजा खेडेकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीयदेखील अडचणीत सापडले आहेत.
मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येईल. त्याचबरोबर पुणे पोलिस दिलीप खेडकरांच्या शोधात आहेत. त्यांच्याबाबतची माहिती मनोरमा खेडकरला माहिती आहे का याबाबतची चौकशी सुरु आहे. यासोबतच खरेदी केलेली जमीन आणि इतर तपासासाठी पोलिस तिच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा: