spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘माझ्यासाठी वाहतूक रोखू नका’ म्हणणाऱ्या शिंदेच्या दौऱ्यासाठी चक्क ‘एसटी’चा मार्गच बदलला

राज्याचे मुख्यमंत्री जिथे जातात तिकडे ट्राफिक जाम करतात असं शिंदे यांच्या दौऱ्यानंतर बोललं गेलं. गणेश उत्सवाच्या काळात ते पुण्यात आले तेव्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

राज्याचे मुख्यमंत्री जिथे जातात तिकडे ट्राफिक जाम करतात असं शिंदे यांच्या दौऱ्यानंतर बोललं गेलं. गणेश उत्सवाच्या काळात ते पुण्यात आले तेव्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यानंतर पुण्यातील चांदणी चौकातही तीच परिस्थिती त्यातच आता मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊ नका, लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पैठण (Aurangabad News) दौऱ्यात रस्त्यावरील एसटीच्या बसेस बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री औरंगाबादला पोहोचल्यावर पैठणला जाताना, या दौऱ्यावेळी औरंगाबाद-पैठण रोडवरील एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच गरज पडल्यास पाचोड मार्गे या एसटी बसेस धावतील असा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे याचा फटका चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, कारकीन पिपळवाडीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अनेक विद्यार्थी सुद्धा एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे याचा फटका महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बसणार आहे.

एसटी प्रशासनाने काढलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री अंदाजे अर्ध्या तासात पैठणला पोहोचतील असा उल्लेख केलेला आहे. मात्र औरंगाबाद ते पैठण दरम्यान मुख्यमंत्री यांचे जागोजागी स्वागत केले जाणार आहे. बिडकीन येथे मोठी रॅली निघणार आहे. त्यातच औरंगाबाद आणि पैठण एकूण पन्नास किलोमीटरचा मार्ग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अर्ध्या तासात पैठणला कसे पोहोचणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या कामाला आजपासून सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss