spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Richa Chaddha च्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, सोशल मिडीयावर दिली गुड न्यूज

नुकतंच या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनापूर्वी मॅटर्निटी फोटोशूट करत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. आता त्यांनी बाळाच्या आगमनाची गोड बातमी शेअर केली आहे. रिचा आणि अली या जोडप्याला मंगळवारी मुलगी झाली आहे.

अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्री रिचा चड्ढाने गोंडस मुलीला १६ जुलै रोजी जन्म दिला आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी चाहत्यांसोबत ही न्यूज शेअर केली आहे. यामुळे आता रिचा चड्ढा आणि अली फजल आई-बाबा झाले आहेत, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून त्यांनी हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

नुकतंच या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनापूर्वी मॅटर्निटी फोटोशूट करत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. आता त्यांनी बाळाच्या आगमनाची गोड बातमी शेअर केली आहे. रिचा आणि अली या जोडप्याला मंगळवारी मुलगी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रिचा चड्ढाने प्रसूतीची वाट पाहत असताना तिच्या बाळाला “आजा यार” म्हणत सोशल मीडिया पोस्टही शेअर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या गोड बातमीने सर्वजण आनंदी आहेत. रिचा आणि अलीने मीडियाला दिलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, “१६ जुलै २०२४ रोजी आमच्या घरी एक निरोगी गोंडस मुलीचा जन्म झाल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचे कुटुंब खूप आनंदी आहेत आणि आमच्या सर्व शुभचिंतकांचं प्रेम आणि आशीर्वादासाठी आभारी आहोत. आमच्यावर असं प्रेम करत राहा.”

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांची लव्ह स्टोरीची सुरुवात ही चित्रपटापासून झाली. ‘फुकरे’ चित्रपटाचं काम करताना त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१३ मध्ये या जोडप्याने डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर रिचा आणि अलीने २०२० मध्ये स्पेशल मॅरेज कायद्यांर्गत लग्नगाठ बांधली. त्यांनी २०२२ मध्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत लग्न केले. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याचे ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता त्यांच्या घरात आणखी एका सदस्याचे आगमन झाले आहे.

हे ही वाचा:

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Malaika Arora पुन्हा एकदा चर्चेत, कोण आहे हा मिस्ट्री मॅन?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss