spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्वेता तिवारी मुलीला लग्न करण्याचा का सल्ला देत नाही ?

श्वेता तिवारी ही छोट्या पाड्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे

श्वेता तिवारी ही छोट्या पाड्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असते. आणि ती रोज सोशल मिडीयावर तिचे नवनवीन लूक पोस्ट करत असते. श्वेताची “मे हू अपराजिता” ही मालिका लवकरच प्रेक्षांकाचा भेटीस येणार आहे. श्वेता तिवारी हिचा चाहत्यांचा वर्ग खूप मोठा आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्वेताने तिच्या मॅरेज लाईफ बदल सांगितले आहे.

हे ही वाचा :MPSC विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग, ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबवणार

 

श्वेताने मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे की, मी माझे पहिले लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. कारण मला समाजात राहायचे होते. आणि मी माझ्या पहिल्या लग्नात खूप चुका केल्या त्याच चुका आता दुसऱ्या लग्नात होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न करत आहे.

मुलाखतीमध्ये श्वेताने सांगितले की, माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही,म्हणून मी माझा मुलीला लग्न न करण्याचा सल्ला देत नाही. मी तिच्या वैयक्तिक जीवनावर जास्त विचार करत नाही तिने तिचे आयुष्य कसे ही जगावे यांनी मला काहीच हरकत नाही. पण ती जर कोणाला डेट करत असेल तर तिने त्याच मुलासोबत लग्न करावं असे वाटत नाही. प्रत्येक लग्न वाईट नसते. मी असे कितीतरी मित्र मैत्रीणी बघितले आहे, की जे लग्नानंतर सुखी आहेत. आणि काहीजण हालाकीच जीवन जगताना पुढे जात आहे. म्हणून मी माझा मुलीला सांगत असते की तिने कोणाचा ही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नये आणि तिने तेच केले पाहिजे तिला ज्यात आनंद आहे.

 

श्वेता तिवारी म्हणाली की तीला कधीही जोडीदाराची उणीव भासत नाही. पलक तिवारी ही देखील अभिनेत्री आहे. आणि ती लवकरच विशाल मिश्रा यांचा सोबत “द सॅफरन चॅप्टर” या चित्रपटाच्या माध्यमातून ती लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे.

हे ही वाचा :

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या कामाला आजपासून सुरुवात

 

Latest Posts

Don't Miss