spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ghatkopar Hoarding Case: Kaisar Khalid यांच्यावर IPC 304A अंतर्गत कारवाई व्हावी: Kirit Somaiya

घाटकोपर होर्डिंग प्रकरणावरून (Ghatkopar Hoarding Case) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज (शनिवार, १९ जुलै) माध्यमांशी संवाद साधत त्यांनी याप्रकरणी लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद (Kaisar Khalid) यांच्यावर गंभीर आरोप करत कैसर खालिद यांच्यावर आयपीसी ३०४ ‘अ’ अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली.

यावेळी ते म्हणाले, “मुंबई पोलिसांनी ३२४३ पानांची चार्जशीट घाटकोपर होर्डिंग प्रकरणात दाखल केली आहे. यात पोलिसांनी लिहिले आहे की रेल्वे पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे घडले आहे. माझी मागणी आहे की कैसर खालिद यांच्यावर आयपीसी ३०४ ‘अ’ अंतर्गत कारवाई व्हावी. चार्जशिट मध्ये ४० बाय ४० साईज लिहीली होती, त्यात एकच होर्डिंग असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे, नंतर हे २०९ फूट बाय १६५ फूट झाले आहेत. यातील अनेक पुरावे आम्ही दिले आहेत. कैसर खलिद यांनी भावेशला सांगितले की जेवढे मोठे लावायचे लावा. कैसर खालिद हे फुट वर लाच घेत होते,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आधी ई निविदा काढायची त्यावर महाराष्ट्र शासन लिहीले आहे आणि दोन वेळा निविदा काढल्या. उद्धव ठाकरे सरकार असताना जानेवारी २०२० मध्ये निविदा काढली आहे. हॉऊसिंगचे आरक्षण रद्द करून पेट्रोल पंपचे आरक्षण केले आहे. यात चार कंपन्यांचे निविदा आल्या ज्यात तीन कंपन्या बोगस आहेत. इगो मीडिया नव्हता म्हणून टेंडर रद्द केले नंतर त्याच्या कंपनीला टेंडर देण्यात आले. सुनील राऊत यांनी भिंडेला सांगितले सेंगावकर यांची बदली केली, कैसर खालिद ला भेटा. व्हीजेटीआयने अहवाल दिल्याप्रमाणे १५८ किलो मीटर प्रति तास प्रमाणे मुंबईत होर्डिंग हवी. भावेश भिंडेने चाळीस लाख काढले त्याने मोहम्मद खान ला दिले त्याने कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाऊंटला पैसे टाकले. दादर होंर्डिग मध्ये ३७ लाख रुपये घेतले आहेत. अमेरिका टूर केली ती स्पॉन्सर केली, त्याने डीजी ला तक्रार केली आहे. माझी शिंदे आणि फडणवीस यांना विनंती आहे की हा खालिद बाहेर का आहे? सुनील दळवी वर पालिका एन विभाग आणि गगराणी कारवाई का करीत नाहीत? या बाबत मी फडणवीस यांची भेट घेणार आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

भाजप प्रवक्त्यांच्या यादीत Nitesh Rane यांच्या नावाला मिळाली पसंती ; Chandrashekhar Bawankule यांची मोठी घोषणा

Mohan Bhagwat यांच्या ‘सुपरमॅन’ वक्तव्यावरून Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss