spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ladki Bahin Yojana: विरोधकांकडून पहिल्यापासूनच योजनेला विरोध, जे टीका करतात तेच महिलांचे फॉर्म भरतायेत: Aditi Tatkare

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत होणार आहे. या योजनेवरून राज्याच्या तिजोरीवर भार पडू शकतो तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने (Mahayuti) हि योजना चालू केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)  नेत्यांनी केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar) आमदार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यावर भाष्य करत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधत आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या, “विरोधकांकडून पहिल्यापासूनच या लाडकी बहीण योजनेला विरोध केला जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जे टीका करतात तेच त्यांच्या मतदारसंघांमध्ये या योजनेचा बोर्ड लावून महिलांचे फॉर्म भरत आहेत. या योजनेवर टीका देखील करत आहेत. माहितीच्या सरकारने ही आणलेली योजना प्रत्येक महिला माता-भगिनींना माहित आहे ती किती महत्त्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून रोज आठ ते दहा लाख फॉर्म भरले जात आहेत. आतापर्यंत बहात्तर लाखापर्यंत फॉर्मची नोंदणी झालेली आहे. यावरूनच लक्षात येत आहे की किती उत्सुकता महिलांना या योजनेच्या बाबत वाटत आहे,” असे त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “या योजनेचे वितरण १५ ऑगस्ट ते रक्षाबंधन या दिवशी कसे मिळतील, हा आमचा मानस आहे. या योजनेमध्ये महिलांना आव्हान आहे की कुठल्याही भूलथापांना पण बळी पडू नका. गावामध्ये शहरांमध्ये कोणताही शासकीय अधिकारी उपलब्ध असेल. तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून देखील फॉर्म नोंदणी करू शकता. ही एकमेव योजना अशी आहे की ती तुम्ही तुमच्या घरी बसून देखील मोबाईल वरती फॉर्म भरू शकता,” असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

Ghatkopar Hoarding Case: Kaisar Khalid यांच्यावर IPC 304A अंतर्गत कारवाई व्हावी: Kirit Somaiya

भाजप प्रवक्त्यांच्या यादीत Nitesh Rane यांच्या नावाला मिळाली पसंती ; Chandrashekhar Bawankule यांची मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss