चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या “धर्मवीर-२” चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी त्याच बरोबर सर्व नेतेमंडळी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. यावेळी अशोक सराफ यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलत असताना अशोक सराफ म्हणाले आहेत की, आता या पिक्चर वर काय बोलावं हेच मला कळत नाही. एका राजकारणी माणसावर असं पिक्चर लिहू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं. नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता. पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असतात. दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितले आणि आता ट्रेलर बघितल्यावर उत्सुकता आणखी वाढली की निश्चित कळत नाही. मला वाटते हा सिनेमा हिट व्हायला काही हरकत नाही तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपोआपलं मत त्याच्यावर ठरवावे. पण माझ्यामते हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवून जाईल असे यावेळी अशोक सराफ म्हणाले आहेत.
या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अनेक दिग्गजांनी आपली हजेरी लावली होती. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सलमान खान, किरण तरडे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांसारखे अनेक दिग्गज शनिवारी उपस्थित होते. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी बोलताना प्रवीण तरडे यांनी तिसऱ्या भागाचेही संकेत दिले आहे. मला वाटत नाही की, भाग दोन झाल्यावर ही गोष्ट संपेल, असं म्हणत त्यांनी तिसऱ्या भागाचे संकेत दिले आहे.
हे ही वाचा:
मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, नागरिकांचे प्रचंड हाल
निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नकली वाघनखांचे प्रदर्शन: Nana Patole