spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज

सध्या मराठी विश्स्वास एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे.

सध्या मराठी विश्स्वास एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Actor Dr. Amol Kolhe) हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) असे या चित्रपटाचं नाव आहे. ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग यात दाखवला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

 रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आता ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नुकतीच अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट शेअर करुन ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची माहिती दिली. या पोस्टला अमोल कोल्हे यांनी कॅप्शन दिली, ‘आमच्या हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्याचे हात मुळासकट उखडून टाकण्याची धमक आम्ही बाळगतो..!” सह्याद्रीच्या नरसिंहाची शिवगर्जना, ‘शिवप्रताप गरुडझेप’ ५ ऑक्टोबर २०२२ पासून चित्रपटगृहांत.! आता फक्त २३ दिवस बाकी!’ या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटाचं पोस्टर देखील शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर हा अमोल कोल्हे यांच्या अमोल ते अनमोल या युट्युब चॅनलवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या टीझरला लाइक केलं आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

‘शिवप्रताप गरुडझेप’च्या टीझरमध्ये सुरुवातीला औरंगजेब उत्तरेत हिंदू मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करताना दिसतो. “तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील दमदार एंट्री होते. “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उघडून देण्याची धमक आम्ही बाळगतो.” हा त्यांचा संवाद अंगावर अक्षरशः काटा आणतो. अवघ्या १ मिनिटाच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

‘शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात येतं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा ‘शिवप्रताप’ मालिकेतील ‘गरुडझेप’ हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील ‘बम बम भोले’ हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

हे ही वाचा:

श्वेता तिवारी मुलीला लग्न करण्याचा का सल्ला देत नाही ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss