spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तारक मेहता का…’ मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वांचीच लोकप्रिय मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वांचीच लोकप्रिय मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला तारक मेहता (Taarak Mehta) म्हणजेच शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. आता मालिकेत त्यांची जागा नवीन कलाकार घेणार आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शैलेश लोढा नंतर आता तारक मेहता हे पात्र लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) साकारणार आहे. सचिन श्रॉफ मालिकेत ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेतील दोन भागांचे चित्रीकरणही त्याने केलं असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन श्रॉफने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. याआधी तो स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार मे’ मालिकेत दिसला होता. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘आश्रम ३’ मधील त्याने साकारलेली हुकूम सिंह ही राजकीय नेत्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो येत आहे.

तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील शैलेश लोढा यांनी साकारलेल्या तारक मेहता या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. परंतु, मालिकेबरोबर केलेल्या करारामुळे ते नाखुश होते. तसेच, त्यांनी दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे त्यांनी हा शो सोडला असल्याचं वृत्त होतं.

हे ही वाचा:

बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज

श्वेता तिवारी मुलीला लग्न करण्याचा का सल्ला देत नाही ?

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे अन्यायकारक, ओबीसी एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss