spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेची जोडी ‘आपडी थापडी’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे आणि मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे हे ‘आपडी थापडी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून येत्या ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी सिनेमाच्या रिलीजची नवी जाहीर केली. सिनेमाच्या रिलीजची डेट जाहीर करत निर्मात्यांनी पोस्टरही रिलीज केले.

श्रेयस तळपदेने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होत असल्याचं म्हटलं आहे. श्रेयसने पोस्ट शेअर करत म्हटले आहे, “फॅमिलीचा पिक्चर, बघू फॅमिलीबरोबर. ‘आपडी-थापडी’ दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहांत!”बाजी आणि पोस्टर बॉईजनंतर तब्बल ६ वर्षांनी श्रेयस मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

हेही वाचा : 

लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा ; नाना पटोले

टीजर कसा आहे ?

अतिशय काटकसरी स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीजरमधून दिसतं.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीता करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

राज ठाकरेंच्या ‘या’ सूचक विधानानंतर, युतीची चिन्ह ?

Latest Posts

Don't Miss