spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खासदार प्रणिती शिंदेंनी संसदेत केला सवाल उपस्थित, दोन्हीकडे भाजप सरकार, मग आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक २२ जुलै २०२४ पासून सुरू झाले आहे. तर काल दिनांक २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक २२ जुलै २०२४ पासून सुरू झाले आहे. तर काल दिनांक २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) विक्रमी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. तत्पूर्वी दिनांक २२ जुलै पासून सुरू झालेले संसदेचे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मोदी ३.० सरकारचा हा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आहे. तर आज संसदेत खासदार प्रणिती शिंदे यांनी सवाल उपस्थित केलं आहे

राज्यात आणि केंद्रात सध्या भाजप सरकार असतानाही महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही तोडगा का काढला जात नाही? असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत केला. महाराष्ट्रात सरकार तणाव वाढवत असल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. संसदेमध्ये आज प्रणिती शिंदे यांनी शून्य प्रहरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आमरण उपोषणाकडे लक्ष वेधले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण आज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडलं. गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.

तर याबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यात आणि केंद्रामध्ये भाजप सरकार असतानाही कोणताही तोडगा का काढला जात नाही. महिला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय आरक्षणाची घोषणा केली होती. त्याची आठवण करून देत खासदार प्रणिती शिंदे यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली.

Latest Posts

Don't Miss