spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पळवापळवीचे अनोखे रूप, मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच काही सेकंदातच १०० किलो पेढे, लाडू गायब

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक आणले जात आहेत, असा दावा विरोधांकडून केला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक आणले जात आहेत, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. तशी एक कथित ऑडिओ क्लीपही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाली आहे. तर दुसरीकडे पैठण मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटालून लावले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेआधी येथील जनतेची भेट घेतली. याच भेटीगाठीदरम्यान एक अजब प्रकार पाहायला मिळा आहे. मुख्यमंत्र्यांनी पेढातुला नाकारताच तेथे ठेवलेल्या पेढ्यांवर लोक तुटून पडले. लोकांनी ११० किलो लाडू आणि १०० किलो पेढे अवघ्या काही सेकंदातच गायब झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

 मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात म्हणजेच पैठण येथे शिंदे यांची एक जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी बिडकीन येथे मुख्यमंत्र्यांची पेढेतुला आयोजित करण्यात आली होती. मात्र ही पेढेतुला एकनाथ शिंदे यांनी नाकारली. त्यानंतर पेढेतुलेसाठी आणलेले पेढे पळवण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्वागत समारंभाकडे शिंदे यांनी पाठ फिरवताच जमलेल्या गर्दीने लाडू आणि पेढे पळवले. अवघ्या एका मिनिटात १०० किलो पेढे तसेच ११० किलो लाडू जमलेल्या गर्दीने पळवले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी संदीपान भुमरे यांची पेढेतुला करण्यात आली होते. त्यावेळीही असाच प्रकार पाहायला मिळाला होता.

 

हे ही वाचा:

पैठणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेला लोकांची तुफान गर्दी, पैसे देऊन गर्दी गोळा केल्याचा शिवसेनेचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss