spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण! औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

शिवसैनीकांनी बकेटमध्ये गोमूत्र आणून लिंबाच्या पाल्याने ते गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं आहे.

शिवसेना आणि शिंदेगटात फूट पडल्यापासून शिवसेना आणि शिंदेगटातील वाद विकोपाला जात आहेत. हल्लीच दादरमध्ये शनिवारी मध्यरात्री शिवसैनिक आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. आमदार सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून दमबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. यावेळी दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली होती. ही घटना घडून अगदी अल्पकाळातच शिवसेना आणि शिंदेगटातील नव्या वादाला तोंड फोडणारी एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री आज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं आहे. रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आल्याचं बोललं जातंय. औरंगाबादमधील बिडकीन येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडलंय. शिवसैनीकांनी बकेटमध्ये गोमूत्र आणून लिंबाच्या पाल्याने ते गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे आता वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावर अद्यापतरी शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादमधील पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. परंतु, त्यांच्या सभेआधीच हा प्रकास घडलाय. घडल्या प्रकाराबद्दल बोलताना शिवसेना कार्यकर्ते म्हणाले, की शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे लोक मोठे झालेत. मात्र, यांनी गद्दारी केली. त्यामुळे बिडकीन शहरातून गेल्यानंतर आम्ही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.  ते पुढे म्हणाले की यापूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आले त्यावेळी शहरातील चौकात सभा झाली. त्यावेळी कोणतीही तयारी केली नव्हती. तरही प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला भाडोत्री लोक बोलवूनही तितके लोक जमा झाले नाही.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ज्याठिकाणी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती तेथेच हा प्रकार झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गोमूत्र शिंपडणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कोणाला मिळाली संधी

iOS 16 रिलीझ: ॲपलच्या मोठ्या अपडेटबद्दल ‘या’ गोष्टी जाणून घेणे आहे गरजेचे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss