spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महिलांवरील वाढत्या अत्याचारविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

Thane : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष (NCP Mahila Congress- Sharad Chandra Pawar Party) आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर तीन पुजार्‍यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली. तर उरण येथे एका यशश्री शिंदे या तरूणीची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awad) तथा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे – पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड (Thane – Palghar Divisional Women President Hruta Awhad) यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Thane Collector Office) आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिला संरक्षणाचे धोरण राबविता येत नसल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

या प्रसंगी ॠता आव्हाड म्हणाल्या की, अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असे जाणवले की पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या तपासाकडे पाहता त्यांची किव येते. निवडणुका आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी. अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशश्रीचा मारेकरी मोकळा आहे. त्यालाही जेरबंद करावे आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर सुजाता घाग यांनी, या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. जेणेकरून दुसर्‍या कुणाची असे गुन्हे करण्याची हिमंत होणार नाही असे सांगितले.

हे ही वाचा:

Virar मधील धक्कादायक बातमी, Shivsena UBT ठाण्याचे उपशहर प्रमुख Milind More यांचे निधन, हल्लेखोर पसार

Pune Zika Virus : पुण्यात Zika ची चिंता वाढली, दोघांचा मृत्यू तर रुग्णसंख्येत वाढ, काय काळजी घ्यायची?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss