spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १३ सप्टेंबर २०२२, मकर राशीच्या लोकांनी आजचा दिवस पितरांना समर्पित केल्याने आत्मिक समाधाना मिळेल

मेष : समाजात तुमची कीर्ती वाढेल. आर्थिक व्यवहारात देवाणघेवाण करताना नियोजन करावे लागेल. लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील. आपण कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार, त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका. न्यायालयीन प्रक्रियेत यश संपादन कराल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेच्या वाटाघाटी यशस्वी होतील.

वृषभ : सुयोग्य पद्धतीचे मार्गदर्शनाचा लाभ होऊन उच्च विचारांची वाढ होईल. मात्र बदलत्या विचार सरणीचा इतर लोक गैर फायदा घेऊ शकतात. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. डोळ्याचे ऑपरेशन किंवा उपचाराची आवश्यकता भासू शकते. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. शब्द सामर्थ्य वाढेल. कोणत्याही विषयाची शहानिशा केल्याशिवाय व्यक्त होऊ नका.

मिथुन : कोणत्याही व्यवहाराबाबत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. येऊ घातलेल्या संकटांवर मार्ग निघेल. आपल्या कला कौशल्याने त्यावर सहज मत कराल. शेती विषयक कोणतेही काम करताना उत्साह वाढेल. भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी वाढू शकेल.

कर्क: योग्य संधीचा फायदा घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक पातळीवर अकारण होणाऱ्या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनाधीनतेपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. चतुष्पाद प्राण्यांच्या खरेदी विक्रीत फायदा होईल. शेतीतील उत्पादनाच्या सुरक्षेची काळजी घ्या. पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा.

सिंह : स्वधर्मावर निष्ठा वाढेल. संत समागमातून आत्मोन्नती होईल. उच्च अधिकार प्राप्तीचे योग आहेत. परदेशातील व्यवहार सुरळीत होतील. महत्वाच्या कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सहज पेलवू शकाल. मन कठोर करावे लागेल. काही अप्रिय घटना कानावर येऊ शकतात. गुडघे दुखीचे विकार त्रासदायक ठरतील.

कन्या : मनावरील ताणतणाव काहीसा हलका होईल. तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे. आपल्या हातून सत्कर्म घडेल. दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल. इतरांच्या कामाच्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील. नोकरदारांना वरिष्ठाकडून सन्मानाची वागणूक मिळेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी. विरोधकांच्या कारवाया विचलित करू शकतात.

तुला : विवाह इच्छूकांसाठी आनंददायी काळ आहे. नववराला साजेशी वधू तर नववधूला साजेसा वर प्राप्त होऊ शकेल. आरोग्यविषयक तक्रारी चालूच रहातील. मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल. पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. मानसन्मान मिळेल, पाठ-कंबर दुखीचे विकार वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी .

वृश्चिक : मामा- मावशी किंवा आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील. शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. बदलीचे योग संभवतात. राजकीय क्षेत्रात अधिक जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील.

धनु : विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त सकारात्मक वातावरण तयार होईल. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळाल. संतती विषयक समस्या दूर होतील. लेखक -पत्रकार मंडळींकडून समाजाला पोषक लेखन घडून येईल. पोटदुखी सारखे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. इच्छूकांसाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून धर्म संस्कृती बद्दल अभिमानास्पद कार्ये घडतील.

मकर : आजचा दिवस पितरांना समर्पित केल्याने आत्मिक समाधानासोबतच पारंपारिक जडणघडण अधिक मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. वाहन खरेदी करताना थोडा संयम आवश्यक आहे. अतिघाई संकटात नेई या म्हणीची आठवण ठेवावी. संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान लाभेल. विविधांगी वाचनाची आवड वाढेल.

कुंभ : कौटुंबिक जीवनात परिवर्तन दिसून येऊ लागेल. काही मंडळी दबाव तंत्राचा वापर करतील तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही तुमच्या मतावर ठाम रहा. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. पीडितांना न्याय मिळवून द्याल. आपण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सामाजिक घडी सुस्थितीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील.

मीन : साहसी खेळ -योगशास्त्र याविषयातील स्वारस्य वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील. वयोवृद्ध मंडळींनी प्रकृतीची काळजी घेण्याची अत्यन्त आवश्यकता वाटते. आपण वर्षानुवर्षे घेतलेल्या अथक परिश्रमाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. स्वकर्तुत्वाने मोठे होण्याबद्दलचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.

Latest Posts

Don't Miss