धुळे शहरात एक भीषण अपघात घडला. एका ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई येथे कार्यरत असलेले पत्रकार हर्षल भदाणे पाटील हे त्यांच्या गावी गेले होते. हर्षल पाटील हे गावावरुन परतत असताना धुळे तालुक्यातील गरताड गावाजवळ त्यांनी त्यांची कार आली असता गतिरोधक पार करताना त्यावेळी धुळे-औरंगाबाद महामार्गावर समोर आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यावेळी हर्षल भदाणे पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी ते ट्रकच्या मागील चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालक आणि त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेनंतर ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी आणि ट्रक चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांसहित सर्व मित्र परिवाराने केली आहे.
हे ही वाचा:
महिलांवरील वाढत्या अत्याचारविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक