spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Beetroot Paratha Recipe: पौष्टिक आणि चविष्ट बीटरूट पराठा नक्की ट्राय करा

बीट हे उच्च रक्तदाब नियंत्रित करते आणि त्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील अशक्तपणा देखील दूर ठेवण्यास मदत होते. तुम्ही अजून बीटरूट पराठ्याची रेसिपी ट्राय केली नसेल तर हा पराठा बनवण्याची सोपी पद्धत कशी आहे हे थोडक्यात पाहूया.

जर तुम्हाला नेहमीच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही बीटरुटचे हेल्दी पराठे बनवू शकता. पोषक तत्वांचा खजिना म्हणून बीटरुटकडे पाहिले जाते. बीट हे उच्च रक्तदाब नियंत्रित करते आणि त्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील अशक्तपणा देखील दूर ठेवण्यास मदत होते. तुम्ही अजून बीटरूट पराठ्याची रेसिपी ट्राय केली नसेल तर हा पराठा बनवण्याची सोपी पद्धत कशी आहे हे थोडक्यात पाहूया.

साहित्य:

  • २ कप गव्हाचे पीठ
  • १ कप बीट किसलेले
  • १ कांदा, बारीक चिरलेला
  • २-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या
  • १/२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • १/२ टीस्पून तिखट
  • १/२ टीस्पून धने पावडर
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून ओवा
  • चवीनुसार मीठ
  • तेल किंवा तूप, पराठा शेकण्यासाठी
  • पाणी, पीठ मळण्यासाठी

कृती:

  • एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात किसलेले बीट, चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, तिखट, धने पावडर, गरम मसाला, ओवा आणि मीठ घाला.
  • सर्व साहित्य चांगले मिसळा आणि थोडे थोडे पाणी घालत पीठ मळा. पीठ ना खूप सैल असावे ना खूप घट्ट.
    मळलेले पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
  • पीठाचे छोटे छोटे गोळे बनवा आणि त्यांना लाटण्याने गोल पराठे लाटा.
  • तवा गरम करा आणि त्यावर पराठा ठेवा. पराठा एका बाजूने सोनेरी रंगाचा झाल्यावर पलटी करा.
  • दुसऱ्या बाजूने पण सोनेरी रंगाचा झाल्यावर तेल/तूप लावा आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.
  • गरमागरम बीट पराठा तयार आहे. हा पराठा दही, लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi Season 5: सूरज चव्हाणची कमाई ऐकून उंचावल्या सर्वांच्या भुवया…

Pune Zika Virus : पुण्यात Zika ची चिंता वाढली, दोघांचा मृत्यू तर रुग्णसंख्येत वाढ, काय काळजी घ्यायची?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss